Akola news:स्व.दिवाली बेन सेदानी शाळेत मराठी भाषा संवर्धन शिबीर
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोट प्रतिनिधी : स्थानिक स्वर्गीय दिवाली बेन इंग्रजी उच्च माध्यमिक शाळेमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा संवर्धन दिवस विषयी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिर अकोट तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ अकोट यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होते. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अकोट चे अध्यक्ष चकोर श्रीकृष्ण बाविस्कर, दिवाणी न्यायाधीश एम.एस. काळे, सह दिवाणी न्यायाधीश भानुप्रताप चौहान, दुसरे सह दिवानी न्यायाधीश विनायक रेडकर, विधीज्ञ संघ अकोट चे अध्यक्ष सुबोध पळसपगार, उपाध्यक्ष महेश देव, स्वर्गीय दिवाली बेन सेदानी शाळेचे संस्थापक सुरेश सेदानी, शाळेचे अध्यक्ष स्मिता सेदानी, प्राचार्य विजय भागवतकर, उपप्राचार्य प्रशांत मंगळे
यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात मराठी भाषा संवर्धन दिवस, अन्न व शिक्षणाचा हक्क, परिवहन नियम आणि परीक्षेला जाता जाता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वक्ते प्रा.विठ्ठल कुलट, विधीज्ञ हर्षलता नाठे, शहर पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, प्रा.अरुण हिंगणकर यांनी संबंधित विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विधीज्ञ मयुरी सोनेकर व शिक्षिका अनुश्री रेलकर यांनी तर प्रास्ताविक विधीज्ञ वैशाली कोरपडे यांनी केले. विधीज्ञ ए.पी.जोत व शिक्षिका शुभ्रता नेमाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विधीज्ञ वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, विद्यार्थी पालक शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता न्यायालयीन अधीक्षक प्रशांत शेंडे, सामाजिक कार्यकर्ता विजय जितकर, गजानन बोरोकार, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.