Akola news:पोलीस दलात ७ पोलीस पुत्रांच्या नियुक्तीचा भावनिक सोहळा संपन्न…

महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद

अकोला पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांच्या आयुष्यात २९ फेब्रुवारीचा दिवस एक आगळा वेगळा व भावस्पर्शी अनुभव देऊन गेला सोबतच कुटुंबाचा आधारस्तंभ गमावून बसलेल्या सात कुटुंबियांना तर या दिवसाने जगण्याची आशाच नव्हे तर उज्ज्वल भविष्याची नवीन संधी उपलब्ध करून दिली. एकंदरीतच अकोला जिल्हा पोलीस दलाच्या जिल्हा मुख्यलयात एकप्रकारे उत्सवाचे वातावरण होते,आणि त्याला कारणही तसेच होते. अकोला पोलीस दलात एकुण ७ पोलीस पाल्यांना अनुकंपा तत्वावर गुरुवार दि.२९.०२.२०२४ रोजी कायमस्वरूपी नोकरीवर नियुक्तीचे आदेश देण्यात आले. पोलीस अधिक्षक कार्यालयात सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ह्या पोलीस पुत्रांना त्यांच्या नियमित नोकरीवर नियुक्तीचे नियुक्तीपत्र व भेटवस्तु देवून त्यांचे अकोला पोलिस दलात स्वागत केले. त्यांना मार्गदर्शन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भावविभोर झालेल्या काही नवनियुक्त पोलीस पाल्यांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झालेला आनंद व्यक्त केला. पोलीस पुत्रांना अनुकंपा तत्वावर नोकरी देऊन त्यांच्या नियुक्तीचा भावनीक सोहळा सोहळा आयोजित करण्याचे आल्याने त्या सात कुटुंबीयांमध्येच नव्हे तर या भावनिक सोहळ्याला उपस्थित असलेल्या कार्यालयीन कर्मचारी,अधिकारी व कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा प्रकारच्या याआधी कधीही न झालेल्या कार्यक्रमामुळे एक नवीनच उर्जा पोलीस दलात नव्यानेच दाखल झालेल्या नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांना मिळाली.या भावनिक सोहळ्याला अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, प्र.पोलीस उपअधीक्षक विजय नाफडे,कार्यालय अधिक्षक किशोर बावणे व कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button