Akola:अकोला जिल्ह्यातील प्रतिभा धर्माळे यांना महिला ड्रोन पायलट होण्याचा पहिला बहुमान

महाराष्ट्र अकोला
मोहम्मद जुनैद

 

भारत सरकारच्या नमो ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइर्जस लिमिटेड (RCF) यांनी निवड केली. अकोला जिल्ह्यातून तालुकास्तरावर एकटीनं जाणारी ती पोहोचले पुणे,सासवड,गुजरात.
केंद्र सरकारच्या वतीने कृषी क्षेत्रात तांत्रिक संसाधनाचा वापर करण्यासाठी भर दिल्या जात आहे. याकरिता नमो ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून आज अकोला जिल्ह्यातील बांबर्डे निवासी प्रतिभा धर्माळे या महिलेची निवड केल्याने अकोला जिल्ह्यातील पहिली ड्रोन महिला पायलट म्हणून बहुमान प्राप्त झाला. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरण कृषी विकासाची सूत्रे महिलांकडे सोपवली.
कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यामध्ये महिला अव्वल ठरू शकते हा माननीय पंतप्रधान यांचा ठाम विश्वास सार्थकी ठरला. ही “उमेद अभियानाची देन आहे” असे प्रतिभाताई चे म्हणणे आहे. कारण आज प्रतिभाताईच्या जीवनात जे घडवून आले आहे ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मुळेच असे त्यांचे म्हणणे आहे. यांचे श्रेय (RCF ) राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइर्जस लिमिटेड आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष, तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष, पूर्ण प्रभाग समन्वयक कक्षाला देते, कारण उमेद अभियानामध्ये माझ्यासारख्या महिला घडविण्याचे काम ते करत आहेत, आणि प्रतिभाताई घरच्या सर्व मेंबरला श्रेय देतात की त्यांनी आज त्यांना बाहेर पडण्याची संधी दिली.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी प्रतिमा धर्माळे यांच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन व गौरव करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button