Akola news:फ्रीडम शाळेमध्ये इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलिम्पियाड परीक्षेत यश मिळविणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार
रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
अकोट:-स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम मराठी शाळा ,आकोट मधील सत्र 2022-2023 च्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलिम्पियाड परीक्षेत यश मिळविणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलिम्पियाड या विषयात कु. क्षितिजा प्रदिप वानखडे वर्ग 5 वी हिला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त केला आहे. तसेच कुणाल रमेश कपले वर्ग 5 वी , खुशी वसंत माकोडे वर्ग 5 वी ह्यांनी इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलिम्पियाड मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. व या यशाकरिता संस्थापक अध्यक्ष मनोज झाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय फ्रीडम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज झाडे ,शाळा समिती अध्यक्ष प्रविण झाडे, मुख्याध्यापिका कु. रश्मी करूले, पर्यवेक्षिका शारदा चांदुरकर, मार्गदर्शिका कु. निता खंडार, कु. अनुराधा कतोरे यांना दिलें आहे. तसेच शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी कौतुक केल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये क्रीडा शिक्षक दिपक ससाने यांनी कळविले आहे.