Mumbai news:मिलिंद अण्णा कांबळे यांची राकांपा वाहतूक विभागाचा राज्यप्रमुख पदी नियुक्ती
मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष व निष्ठावान कार्यकर्ते मिलिंद (अण्णा)भूपाल कांबळे यांची राकांपा वाहतूक विभाग राज्यप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे।राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष प्रमुख शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार व अध्यक्ष जयंत पाटील व मुंबई प्रदेशाध्यक्ष राखीताई जाधव आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात येथे वाहतूक विभाग अध्यक्ष जयंत पाटील यांचे हस्ते मिलिंद अण्णा कांबळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे।
मिलिंद अण्णा कांबळे हे वाहतूक विभाग अध्यक्ष जयंत पाटील यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात ,व पक्षातर्फे अनेक आंदोलनात जयंत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात।मिलिंद कांबळे थेट वाहतूक राज्य प्रमुख पद दिल्याने पार्टी कार्यकर्तेत उत्साहाचे वातावरण आहे, भविष्यात परिसरातील वाहतुकीच्या समस्या देखील सोडवल्या जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे ।मिलिंद अण्णा कांबळे यांनी वाहतूक विभाग राज्यप्रमुख पदावर नियुक्ती झालेबद्दल राकांपा मुंबई उपाध्यक्ष संजीव उपाध्याय यांनी अभिनंदन व पुढील कार्याचे वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केले आहे।