निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी साकारला नृत्याविष्कार!

Students from Nirmal International School created a dance masterpiece!

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा- निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील १४ वे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाले. कार्यक्रमासाठी निर्मल स्कूलच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमत: अतिथी व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.विद्यार्थ्यांना नृत्याविष्कार करण्यासाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्कारातून प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या भाषांमध्ये सूत्रसंचालन करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मनोगतात शाळेतील सर्वच विद्यार्थी व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबतच वाचन, वकृत्व, खेळ, नृत्य, गायन यासारख्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजेत असे सांगून पालकांनी आपल्या मुलांसाठी अधिकाधिक वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन केले.याप्रसंगी निर्मल सीड्स चे महाव्यवस्थापक सुरेश पाटील, निर्मल स्कूलचे सचिव नरेंद्रसिंग सूर्यवंशी, उपाध्यक्ष श्रीमती कमलताई पाटील, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button