भडगाव चौक सुशोभीकरण कौतुकास्पद…आमदार मंगेश चव्हाण

भड़गांव रिपोर्टर ,देवीदास महाजन /सोनवने सुरेश पाटील जलगांव जिला अध्यक्ष
भडगांव शहरातील पाचोरा रोड शहीद निलेश सोनवणे चौक इंदर कॉम्प्लेक्स ते उज्वल कॉलनी उद्यान पर्यंत केलेले चौक सुशोभीकरण पाहणीसाठी चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण हे स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह आले होते.त्यांचे सोबत चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल पाटील, प्राध्यापक प्रदीप देसले,सोमनाथ पाटील,सह इतर निवडक कार्यकर्ते होते.सदरचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निधीतून विजयकुमार भोसले यांच्या मूळ संकल्पनेतून व स्वतःच्या कल्पकतेने सुंदर असे चौक सुशोभीकरण अगदी कमी खर्चात व शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे असे चौक सुंदर तयार केली आहेत याबद्दल त्यांनी विजयकुमार भोसले यांचे कौतुक केले.
हे काम इतक्या कमी खर्चात इतके अतिशय सुंदर कसे तयार झाले असे आमदार मंगेश चव्हाण यांनी विचारले असता, विजयकुमार भोसले यांनी सांगितले की सदरचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह,आमचे कार्यकर्ते ,कॉलनीतील रहिवासी व वॉर्डतील नागरिक यांच्या सहकार्याने पार पडले आहे. यानंतर उज्ज्वल कॉलनी उद्यानातील रोहिणीश्वर महादेव मंदिरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आरती होऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.मंगेश चव्हाण यांनी सदर चौक व उद्यान सुशोभीकरण कामांचे कौतुक करून परिसरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button