Akola:लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024- 28- आकोट विधानसभा मतदार संघ
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद
स्विप अंतर्गत मतदान जन जागृती
स्काऊट गाईड ,व राष्ट्रीय सेवा पथकांनी स्वयंसेवक बनावे !!
मतदार जन जागृती समिती चे आवाहन
आकोट- निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर,यांचे आदेशानुसार तहसीलदार डॉ.सुनील चौहान आणी न.प.चे प्रशासक तथा मुख्याधिकारीडॉ.नरेंद्र बेंबरे यांचे मार्गदर्शनात शहरात मतदार जागृती करण्याचे दृष्टीने भाऊसाहेब पोटे विद्यालयात आयोजित करण्यातआलेल्या व्यासपीठीय कार्यक्रमात स्वीप अंतर्गत शाळेतील महाविद्यालयातील स्काऊट,गाईड व राष्ट्रीय सेवा पथकातील विद्यार्थ्यांनी मतदानाच्या दिवशी स्वयंसेवक म्हणुन राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असेआवाहन मतदार जागृती समितीच्या वतीने करण्यात आले व्यासपीठावर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सुभाष सावंग,विद्यालयाचे प्राचार्य प्रविण रावणकर ,सेवानिवृत्त प्राध्यापक विजय जितकर, समितीचे सचिव तथा शहर समन्वयक महेंद्र राऊत, सदस्य अ.खालीद अ.सादिक,मो.शाकीर अ.राजीक,शरद भगत उपस्थित होते,कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाची विद्यार्थिनी नयना खांडेकर हिचा जल मिशन निबंध स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल पालकासह गुण गौरव करण्यात आला त्यानंतर प्रास्ताविकातून महेंद्र राऊत यांनी मतदानाचे महत्त्व विषद करून कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्था व शाळेचे अभिनंदन करीत आभार मानले. त्यानंतर राष्ट्रीय कार्याची आवड असलेले सेवानिवृत्त प्राध्यापक विजय जितकर यांनी विद्यालयातील स्काऊट, गाईड पथकातील सर्व विद्यार्थ्यांनी येत्या 26 एप्रिल ला होत असलेल्या मतदानाच्या दिवशी स्वयंसेवक म्हणुन राष्ट्रीय कार्यात सहभागी होवून आई वडिल, शेजारी तसेच वयोवृद्ध मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करून मतदान केंद्रावर सेवा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.नियोजनबद्ध काढण्यात आलेली प्रभात फेरी,मुलामुलींनी काढलेल्या सुबक रांगोळ्यातून मतदारांना दिलेला संदेश,लक्ष वेधून करण्यात आलेली चित्रे, घोषवाक्ये याबद्दल मान्यवरांनी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.प्राचार्य यांनी शाळा नेहमीच अग्रस्थानी राहण्यासाठी भाऊसाहेब पोटे ,संस्थेचे अध्यक्ष शिरीष पोटे,सचिव डॉ.मेघना पोटे यांचे मार्गदर्शन लाभते तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य असते याबाबत आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन सवळे सर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विवेक पोटे यांनी केले या प्रसंगी शहर मतदार जन जागृती समितीचे सदस्य भूषण नाथे,खान फिरोज खान,सलीम शाह कदीर शाह
वसीम अली ईमदाद अली
सादिक अली राजीक अली , मो.मोबीन यांच्यासह शाळेतील प्रविण पोटे,पंजाब गावंडे,संतोष बेराड, कन्हैया गौर,जयंत वावगे,सर्व शिक्षक वृंद हे उपस्थित होते