Akola news:आकोट शहर पोलीस स्टेशन मध्ये इफ्तार पार्टी व इतर सण उत्सवाचे पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन
रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
पोलीस स्टेशन आकोट मध्ये इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले या कार्यक्रम ला उपस्थित मा.श्री. संदिप घुगे,पोलीस अधिक्षक, अकोला,मा. पोलीस अधिकारी खोकर मॅडम मा.पोलीस निरीक्षक अकोट शहर अहिरे साहेब मा.पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन आकोट यांचे प्रमुख उपस्थितीत होती अकोट शहर पोलीस स्टेशन सावली सभागृहात मा.शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठीत नागरीक, हिंदु समाज बांधव व मुस्लीम समाज बांधव पत्रकार बंधू प्रतिष्ठित नागरिक यांना आमंत्रीत करून आगामी रमजान ईद, परशुराम जयंती, बसवेश्वर महाराज जयंती, अक्षय तृतीया चे अनुषंगाने इफ्तार पार्टी व इतर सण उत्सवाचे पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व कार्यक्रमा मध्ये अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे साहेब व अहिरे साहेब यांनी सूचना दिल्या त्यांनी सांगितले की सोशल मीडिया वरील होत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही कोणताही मेसेज ची चौकशी केल्या शिवाय फॉरवर्ड करायचा नाही व कार्यक्रम चांगले तर्हेने पार पडला