कराडच्या रितिशा भट्टड ने केले ग्लोबल जीनियस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दमदार नोंद
मलकापूर (ता. कराड) येथील रितिशा अनुप भट्टड या ९ वर्षाच्या विद्यार्थिनींने डोळ्यावर दोन पट्ट्या बांधून ११ प्रकारच्या अँक्टिव्हिटी करून ग्लोबल जीनियस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. त्याबद्दल तिचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
रितिशाची आई जयश्री भट्टड (कोच, founder आणि Educator)या कराडात ब्रेन बूस्टर च्या कोच म्हणून काम करीत आहेत. त्यांचे मलकापूर येथे क्लासेस असतात. गेल्या ६ महिन्यांपासून त्यांनी आपल्या मुलीचा याबाबत सराव करून घेतला. त्यात योगेश सरांची मदत मिळाली. या ब्रेन बूस्टर कोर्स मुळे रीतिशा ची एकाग्रता, आत्मविश्वास, ज्ञानग्रहण करण्याची क्षमता त्यांनी वाढली. आणि त्यामुळेच डबल ब्लाइंड फोल्डर करून रितिशाने ११ अँक्टिव्हिटी कमी वेळात पूर्ण करण्याचा मान मिळविला.
डोळ्यावरती दोन पट्ट्या बांधून गिनीज बुक रेकॉर्ड व्होल्डर विशाल देसाई व तनुजा देसाई यांचे समोर रंग ओळखणे,एकाच कागदावरील वेगवेगळे रंग ओळखणे, अक्षर की अंक आहे हे ओळखणे, एखाद्या छायाचित्राची इतंभूत माहिती देणे, पुस्तकातील पान नंबर सांगणे, पुस्तकातील ओळी वाचन करणे, सांगितलेले लिहून दाखवणे, नोटेवरील सिरीयल नंबर ओळखून दाखवणे, एकत्र असणारे रंग वेगवेगळे करणे, शून्य ते नऊ पर्यंतचे अंक क्रमाने लावणे व वन साईड रुबिक क्यूब सॉल्व्ह करणे अशा ११ अँक्टिव्हिटी तिने कमीत कमी वेळात केल्या.
यावेळी वैभव लक्ष्मी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक कृष्णत पाचपुते, संचालिका कार्तिकी पाचुपते, शिवसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजू शेटे, श्वेता वनग्राम ज्वेलरीचे संचालक विजय कदम, शितल कदम,अँड. नरेंद्र चिंगळे, ज्योती चिंगळे, उज्वला गरुड, योगेश लोंढे, मनाली चांडक, स्मिता पवार, मिलिंद भंडारे, प्रमोद सुकरे, स्नेहा तोडकर आदींची उपस्थिती होती. अश्विनी अंबाली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
फोटो
कराड येथे रितिशा भट्टड , जयश्री भट्टड आणि अनुप भट्टड सन्मान स्वीकारताना