पाचोरा बाजार समितीत स्वच्छता अभियान* आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वतः केली स्वच्छता!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी) : मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार आणि पणन विभागाच्या परिपत्रकानुसार राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये सुरू असलेल्या १०० दिवसांच्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ पाचोरा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत करण्यात आला.
दि. २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता बाजार समितीच्या मुख्य यार्डात मा. आमदार किशोर आप्पा पाटील व मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पाचोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. या वेळी बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, संचालक मंडळ सदस्य प्रकाश तांबे, मनोज सिसोदिया, युसुफ पटेल, सुनिल पाटील, लखीचंद पाटील, राहुल पाटील, राहुल रामराव पाटील, विजय पाटील, तसेच व्यापारी प्रतिनिधी व मोठ्या संख्येने हमाल-तोलारी आणि कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.
स्वच्छता अभियानादरम्यान बाजार समितीच्या आवारातील मोठ्या प्रमाणात असलेला कचरा, पाला-पाचोळा व इतर घनकचरा हटविण्यात आला. यापुढेही बाजार समितीमध्ये नियमितपणे स्वच्छता अभियान राबविण्यात येईल असे मा. आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. बाजार समितीच्या वतीने सभापती व संचालक मंडळाने उपस्थित सर्वांचे आभार मानले.