इनरव्हील क्लब च्या वतीने नवरात्रीमध्ये नवदुर्गांना अनोखी भेट
रिपोर्ट:पीयूष प्रकाश
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या वतीने नवरात्रीमध्ये हुशार व गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकली देऊन अनोखी भेट देण्यात आली.ग्रामीण भागातील हुशार मुलीसाठी इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमने हा वेगळा उपक्रम राबविला आहे. शाळेपासून तीन-चार किलोमीटर लांब चालत येणाऱ्या मुलींना या सायकली भेट देण्यात आल्या. त्या मुलींचा शाळेत येण्या जाण्याचा वेळ वाचणार आहे. तसेच हा वेळ त्यांना अभ्यासासाठी देता येणार आहे. या मुलींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना पायी चालत शाळेला जावे लागत आहे. ही त्यांची गरज ओळखून क्लबच्यावतीने त्यांना सायकल भेट देण्यात आली. चोरे येथील जिजामाता विद्यालयातील कु. प्रणिता केंजळे व कू. श्रुती करांडे तसेच तुळसण येथील निनाई देवी विद्यालयातील कू. दिव्या मोरे व कू. स्नेहल मोरे या हुशार मुलींना या सायकली देण्यात आल्या. क्लब प्रेसिडेंट तरुणा मोहिरे यांनी सर्वांचे स्वागत केले. सेक्रेटरी छाया पवार यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ कराडचे प्रेसिडेंट बद्रीनाथ धस्के, सेक्रेटरी शिवराज माने, रेखा काशीद यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. शिक्षक महेंद्र जानुगडे सर यांनी यावेळी या उपक्रमाचे कौतुक केले व क्लबचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी जीवन पवार सर, मुलींचे पालक, शिक्षक, तसेच वृषाली पाटणकर,सुषमा तिवारी,दिपाली लोहार,पुष्पा चौधरी ,रतन शिंदे,शिवांजली पाटील सूकेशनी कांबळे, स्नेहांकी आवळकर उपस्तीत होते.