धनकवडी:शंकर महाराज मठात,शिव उपासना महायज्ञ
धनकवडी – अधिक मासाचे औचित्य साधून सोमवारी ३१ रोजी शंकर महाराज मठ पुणे येथे १२१ दाम्पत्यांनी सामूहिक रुद्राभिषेक पूजा व हवनात सहभाग घेतला. मनोजय करंबळेकर यांच्यासह २१ घनपाठी आचार्यांनी रुद्रपठण व मंत्रोद्घोष केला. संपूर्ण शंकर महाराज समाधी परिसर रुद्र व मंत्र पठाणाने दुमदुमून संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.
मठात संपूर्ण वर्षभर प्रथेप्रमाणे निरनिराळ्या देवतांचे याग होतात, त्यात प्रामुख्याने गणेश, विष्णू, नवचंडी व दत्तयाग समाविष्ट आहेत. कार्यक्रमाचे नियोजन व सहभाग विश्वस्त सुरेंद्र वाईकर, सतीश कोकाटे, डॉ.पी.डी. पाटील, मिहीर कुलकर्णी राजा सूर्यवंशी, नीलेश मालपाणी व प्रताप भोसले यांनी केले.
मठातर्फे दररोज अन्नदान करण्यात येत होते. त्यात कमला नेहरू, भारती मेडिकल आणि ससून जनरल हॉस्पिटल येथे खिचड़ी वाटप केले जाते. सावित्रीबाई विद्यापीठाच्या प्रांगणातही गरजू विद्यार्थ्यांना खिचडी वाटप केले जाते. त्याचबरोबर आरोग्य व वैद्यकीय निधीतून दर दुर्गाष्टमीस मठात रक्तदान शिबिर घेतले जाते.ट्रस्टतर्फे फिरता दवाखाना उपक्रम राबवला जातो, यात पुणे शहरातील मजूर अड्डे आणि गरीब वाड्या-वस्त्यांवर आरोग्य तपासणी व औषध वाटप केले जाते. त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक वनीकरण, कचरा आणि प्लास्टिकमुक्त तळजाई उपक्रम राबवला जात असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली.