श्री. गो.से. हायस्कूल येथे महाराष्ट्र दिन साजरा
Maharashtra Day celebrated at Shri. Go.S. High School
पाचोरा प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील ,पर्यवेक्षिका सौ. ए.आर.गोहिल, आर. बी तडवी, महेश कौंडिण्य एस. पी.करंदे, एस. एन. पाटील , किमान कौशल् अजय सिनकर सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी शांताराम चौधरी यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. रुपेश पाटील यांनी राष्ट्रगीत व राज्य गीताचे गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी.बोरसे यांनी केले.