मुंबई:ट्रान्स हार्बर सागरी सेतूवरील अन्यायकारक टोल रद्द करा.- सुरशेचंद्र राजहंस
ट्रान्स हार्बर लिंक रोडवर २५० रुपये टोल कारचालकांचा खिसा कापणारा.
रिपोर्ट/अजय उपाध्याय
मुंबई – नवी मुंबई जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकरोडवर २५० रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. २१ किलो मिटरच्या मार्गासाठी कारला २५० रुपये टोल हा कार चालकांचा खिसा कापण्याचा प्रकार आहे. राज्यातील असंवैधानिक तिघाडी सरकार २५० रुपयांचा जाचक पथकर लावून महावसुली करत आहे. ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील हा जाचक टोल रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते व मुंबई काँग्रेस स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड या सागरी सेतूचे बहुतांशी काम महाविकास आघाडीचे सरकार असतानाच पूर्ण झाले होते. आता भाजपाप्रणित सरकार मात्र त्याचे श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहे. या प्रकल्पाच्या कामाला शिंदे सरकारच्या काळात विलंब झाल्याने तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा खर्च वाढला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास दिरंगाई झाल्याने हा दोन हजार कोटी रुपयांचा भुर्दंड जनतेच्या डोक्यावर पडणार आहे. या प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी कारला २५० रुपयांचा टोल आकारून भाजपा सरकार कारचालक-मालकांचा खिसा कापणार आहे.मुंबईत प्रवेश करणाऱ्या मार्गावरील टोल रद्द करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून जोर धरत आहे परंतु महावसुली सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही उलट टोल वसुलीचा धंदा जोरात सुरु आहे. आता नव्या सागरी सेतूमुळे वसुली जोरात होणार आहे. २१ किलोमीटरसाटी २५० रुपयांचा टोल भरण्यापेक्षा वाहनचालक सध्या असलेल्या पूर्व द्रुतगती मार्गाचाच वापर करण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारने नवीन ट्रान्स हार्बर मार्गावरील कारसाठी प्रस्तावित केलेला २५० रुपये टोल रद्द करावा अशी मागणी सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.