अवकाळी पाऊस गारपीटीवर जालीम उपाय, झाडे लावा झाडे जगवा = पंजाब डख
रिपोर्ट।मोहम्मद जुनेद
शेतकऱ्यांनी वसुंधरेचे रक्षण करणे गरजेचे असून त्यासाठी पुढाकार घ्यावा सरकारला संरक्षणाचे धडे द्यावेत जो खेळ निसर्गाचा चालू आहे त्याला पृथ्वीच्या तापमानाची वाढ कारणीभूत आहे धरतीचे तापमान वाढतच असून त्यावर झाडे लावणे व जगणे हाच जालीम उपाय आहे त्यासाठी जंगलतोड थांबवावी वृक्षारोपण कार्यक्रम राबवणे असे मत हवामान तज्ञ पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना मत व्यक्त केले, उद्घाटक प्रसंगी अविनाश ठाकरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
सर्वप्रथम शेतकरी मेळाव्याला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवजारांचे उद्घाटन करून ज्योतीरावजी फुले , थोर महात्म्यांच्या फोटो प्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीताताई अढाऊ यांच्या हस्ते करण्यात आले, पाहुण्यांचे फुल पुष्प देऊन स्वागत करून पुरस्कार प्राप्त जगन बगाडे व तीन फाळी नागराचे जनक ज्ञानदेवराव चव्हाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, व नितीन शेगोकार यांची विभागीय शिक्षक आघाडी सचिव पदी नियुक्ती सुद्धा करण्यात आलीयावेळी प्रास्ताविक मनोगत मनोज झाडे सर यांनी करून कार्यक्रम स्थळी उद्घाटक अविनाशजी ठाकरे, प्रमुख वक्ते पंजाबराव डख, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीताताई अढाऊ, सौ संध्याताई देशकर,रवींद्र अंबाळकर ,राजेश जावरकर, संजय बोरोडे ,महेश गणगणे, संतोष रहाटे, दीपक खलोकार, संदीप भुस्कट मयूर निमकर,पवन बेलसरे ,प्रदीप लांडे, श्रीकृष्ण गोरडे, सुनील अंबळकार, मंगेश चिखले, सौ शितलताई सुपासे, सौ.स्वातीताई चिखले, प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली शेतकरी मेळावा यशस्वी ते करता सुरज नाथे, केशव बिलबिले हर्षल खासबागे,नंदकिशोर गोरडे, केशव लांडे, ऋषिकेश सुपाशे, रवींद्र पोटदुखे, मंगेश टाक, संकेत नाथे, अमोल निमकर, अतुल अढाऊ, नंदकिशोर हाडोळे,अचल बेलसरे , वैभव डांगरे,यावेळी सूत्रसंचालन नितीन शेगोकार सर तर आभार प्रदर्शन ऋषिकेश सुपासे यांनी कार्यक्रमाला विविध प्रकारातून मदत सहकार्य करणाऱ्या माळी समाज बांधवांची मनःपूर्वक आभार मानले,