ठाणातील गोरक्षक अतुल पेठ यांचा माजी राष्ट्रपती कडून भारत गौरवरत्न पुरस्कार

सुधाकर श्याम भोइर की रिपोर्ट
शहापूर तालुक्यातील अघई येथील सुचितापेठे बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टीचे सर्वेसर्वा अतुल पेठे यांचा माजी राष्ट्रपती रामदास कोविद युनियन कॅबिनेट मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिल्ली येथे भारत गौरव रत्न पुरस्कार सन्मान करण्यात आला.ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील आघई येथे सुचितापेठे बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट असून धार्मिक क्रीडा, प्रोत्साहन शिक्षण, आणि सामाजिक कार्यामध्ये संस्था कार्यरत आहे. सुचितापेठे यां संस्थेच्या अध्यक्ष असून अतुल पेठे सचिव आहे. संस्थेतर्फे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. तसेच ज्यांना शिकायचे आहे. पण आर्थिक अडचणीमुळे शिकू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी भरून त्यांची शिक्षणासाठी सहकार्य केले जाते. तसेच आघई येथे संस्थेची गोशाला असून या ठिकाणी गोमाते सोबत नंदीचा ही सांभाळ केला जातो.संस्थेतर्फे नियमित आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच कोविड काळात तब्बल 21 आदिवासी पाडे दत्तक घेऊन त्यांना अन्नधान्य, आरोग्य सुविधा, पुरवण्यात आल्याचे अतुल पेठे यांनी सांगितले. शिवाय आदिवासी आणि इतर मुलांसाठी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा संस्थेची संकल्पना आहे. तसेच वृद्धाश्रमाचे देखील काम सुरू आहे. असे अतुल सुचिता जयवंत पेठे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button