अवैध गौणखनिज,वाळूचोरी, विनानंबर नियमांचे उल्लंघन करणारे वाहनांवर कार्यवाही,
Action taken against illegal minor minerals, sand theft, and vehicles violating unregistered rules. Action taken against 8 tractors, 1 dumper, and 24 two-wheelers in the campaign!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कवीता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदशनात पाचोरा पोलीस स्टेशनचे वतीने मोटार सायकल चोरी व अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी वाहनां विरुध्द दि. २८डिसें. पासुन पाचोरा पोलीस स्टेशन हददीत मोटार वाहन नियमांचे उल्लंघन व विना नंबर प्लेट वाहन चालकां विरुध्द धडक मोहिम सुरु करण्यात आली आहे . आज पावेतो एकुण ८ ट्रॅक्टर, १ डंपर व २४ दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायदयाअंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही यापुढे देखील चालणार असुन नागरीकांनी आपल्या वाहनावर नंबर प्लेट लावुन वाहनाचे कागदपत्र जवळ बाळगावे व वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक पवार पाचोरा यांनी केले आहे.