Akola news:आस्की किड्स च्या विद्यार्थ्यांना आय पी एस सुरज गुंजाळ सर यांनी दिला”सक्सेस मंत्रा”

महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

Akola:आस्कि किड्स पब्लिक स्कूल अकोट ही नेहमी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण गुणात्मक विकासासाठी नवनवीन संकल्पना राबविणारी शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी गुणांना नवा आयाम देण्यासाठी शाळास्तरावर औद्योगिक क्षेत्रभेट, मुलाखत उपक्रम, ऐतिहासिक क्षेत्रभेट, स्पर्धा परीक्षा उपक्रम, जीके फोरम, इंग्लिश मिनिया या सारखे असंख्य उपक्रम राबवले जातात. त्यात आणखी भर म्हणून शालेय प्रशासनाने आणखी शालेयपुरक उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला आणि सहाय्यक शिक्षिका वैशाली कुलकर्णी आणि मनिष सरकटे सर यांच्या नेतृत्वात “द सक्सेस मंत्रा” हा उपक्रम सुरू केला. ज्या माध्यमातून कला, साहित्य, नागरी सेवा, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, अर्थशास्त्र, राजनीती, पत्रकारिता अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा प्रेरणात्मक संदेश मुलांना देण्याचा मानस शाळा प्रशासनाचा आहे.ह्याच संकल्पनेला अनुसरून ह्या आठवड्याचे प्रेरणा संदेश देणारे मान्यवर आयपीएस श्री. सूरज भाऊसाहेब गुंजाळ (सहायक पोलिस अधीक्षक) हे होते. ज्यांनी मुलांसोबत दिलखुलासपणे संवाद साधत मुलांना “सक्सेस मंत्रा” दिला.
यावेळी त्यांनी विद्यार्थी कसा असावा, विद्यार्थ्याचे कर्तव्य, समाजभान, यश-अपयश, ध्येय, संयम, सातत्य ह्या बाबीवर प्रकर्षाने जोर दिला. तसेच यावेळी वर्ग ७ ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी पोलिस अधीक्षक यांना आपल्या मनातील प्रश्न विचारले आणि सनदी नागरी सेवा या परीक्षेबाबत आपल्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थी मन किती हळवे असते आणि ते किती सहज गैरमार्गाने वळते त्यामुळे त्यावर नियंत्रण कसे करावे हा अमूल्य संदेश गुंजाळ सरांनी यावेळी मुलांना दिला. कार्यक्रमाच्या शेवटी गुंजाळ सरांनी स्काऊट- गाईड च्या मुलासोबत वृक्षरोपण केले. याप्रसंगी विचारपिठावर शाळेचे सचिव नितीनजी झाडे सर आणि प्राचार्य नेहा झाडे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाची संकल्पना नितीनजी झाडे सर यांनी मांडली आणि या कार्यक्रमाला नेहा झाडे आणि पवन चितोडे सर यांच्या मार्गदर्शनात सौ. वैशाली कुलकर्णी मॅम आणि मनिष सरकटे सर यांनी पूर्ण रूप दिले. यावेळी कार्यक्रमाचे संचलन वर्ग ९ च्या विद्यार्थिनी अदिती रंदे हिने तर आभार अनुश्री डिक्कर हिने मानले. यावेळी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या बरोबर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button