उलवे येथील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहसंचालकांची भेट घेतली

उलवे महाराष्ट्र:आज दिनांक 17/7/2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिडकोचे सहसंचालक (जॉईन एमडी) श्री राजेशजी पाटीलसाहेब यांची भेट घेऊन उलवे शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सिडको प्रशासनाला निवेदन दिले. सेक्टर 24, 25, 25 अ आणि इतर सेक्टर्स सोबतच इतर महत्वाच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मनसे उलवे शहर अध्यक्ष श्री. राहुल बाबुराव पाटील, मनसे उलवे शहर उपाध्यक्ष श्री.कल्पेश भरत कोळी, मनसे उलवे शहर सचिव श्री.मनोज विलास कोळी, मनसे उलवे शहर सरचिटणीस श्री. सुनील जगन कोळी, कोंबडभुंजे गाव शाखेचे अध्यक्ष चिराग कोळी, उलवे गाव शाखेचे अध्यक्ष विशाल भोईर, उलवे गाव शाखेचे उपाध्यक्ष संदीप म्हात्रे, गणेशपुरी गाव शाखेचे अध्यक्ष महेंद्र काळूराम कोळी, गणेशपुरी शाखेचे उपाध्यक्ष प्रेमनाथ धरम कोळी, उलवे शहर सेक्टर-९ शाखेचे अध्यक्ष डॉ. पाटील, शाखा उपाध्यक्ष संदीप बाबर, सेक्टर 17 शाखेचे अध्यक्ष अनिकेश कोळी व उलवे शहरातील तमाम महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button