Akola news:मुंडगाव लोहारी परिसरातील शेतीमध्ये नदीचे पाणी गेल्यामुळे पिकाचे नुकसान • सर्वे करण्याची मागणी,हजारो एक्कर शेती पाण्याखाली
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
एकवीस तारखेच्या रात्रीला नदीला आलेल्या पुरामुळे मुंडगाव लोहारी परिसरातील शेती मध्ये पाणी गेल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून जमिनीच्या वर आलेल्या पिकाचे नुकसान झाले असून पाण्यामुळे झालेल्या पिकाचे नुकसानाचा सर्वे करावा असी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे,एकवीस तारखेच्या रात्रीला झालेल्या मुसळधार पावसाने नदीला आलेल्या पुरामुळे मुंडगाव, लोहारी, खानापूर, जळगाव, नेव्होरी,लामकानी,या परिसरातील नदीकाठाच्या हजारो एक्कर शेतीमध्ये नदीचा परिसर सोडून सुद्धा दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील शेतीमध्ये सुद्धा नदीचे पाणी गेल्यामुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जमिनीच्या वर नुकत्याच आलेल्या अंकुरलेल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाण्यामुळे झालेल्या पिकाचे नुकसानाचा सर्वे करावा असी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे