Akola news:हिवरखेड येथे मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या नागरिकांनाच्या वस्तीची संबधित तलाठी यांनी केली पाहणी
Akola:हिवरखेड येथे मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या नागरिकांनाच्या वस्तीची संबधित तलाठी यांनी केली पाहणी.तर ज्याच्या घरात शिरले पाणी अशा नागरिकांची पाहनी ग्रामपंचायत सदस्य गट नेता यांनी केली पाहणी,हिवरखेड शिवसेना शिंदे गट, राष्वादी शरदपवार गट, प्रहार पक्ष, वंचित आघाडी या पक्षांनी घेतला पुढाकार,
हिवरखेड येथे गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा वेग वाढला व गावातील रहिवासी तसेच शेतकऱ्यांनच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,त्यामध्यें अनेक नागरिकांच्या वस्तीत पाणी घुसले व हे पाणी घरात शिरल्याने अनेकांच्या भीती कोसळल्या तर अनेकांच्या घरातील वस्तूचे नुकसान झाले ,धान्य किराणा खराब झाला, अनेक शेतकऱ्यांनची पिके वाहून गेली, अशातच कोणी मोठा लोकप्रतिनिधी यांची मदत करेल या आशाचे किरण या नुकसान ग्रस्तांना लागले, यावेळी याच्या मदतीला प्रहारचे रवीराणा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, धंनजय गावंडे, शिवसेना शिंदे गटाचे, संदीप बोडखे,प्रमोद निळे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मदत करायला धावले, अनेकांची या पावसात पळझळ झाली त्यांना सावरा सावरी करायला मदत केली, तर शासनाच्या वतीने संबधित पटवारी भाग १ चे तेलंगोटे व भाग २ च्या तलाठी मावळे मैडम यांनी नुकसान ग्रस्तांनच्या घराची पाहनि करून पंचनामा केला , सदर पंचनामा हा तेल्हारा तहसीलदार येवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला, तसेच राशन दुकानदार प्रदीप पाटील, रवी वानखडे, यांनी नुकसान धारकांना ध्यान सुद्धा वितरित केले, वार्ड क्र २ मधील नुकसान धारक होरे बाई, गावंडे बाई, गवई बाई यांच्या घरांची पाहणी केली, वार्ड क्र ६, मध्ये भुडके, बकाल,, याच्या घरांची पाहणी केली, वार्ड क्र २ मधील मातंग पुऱ्यातीलतील नागरिकांनी ग्रामपंचायतला घरकुल देण्यासाठी टाहो फोडला, आणखी नुकसान ग्रस्तांनची पाहनी करण्यात येईल असे संबधित तलाठी यांनी सांगितले, या नुकसान धारकांना त्वरित मदत घोषित करा अशी मागनि विविध पक्षाकडून तर करण्यात आलीच त्याचं बरोबर नुकसान ग्रस्थानी सुद्धा मदतीची मागणी केली, यावेळी तलाठी ,
कोतवाल, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,
प्रतिक्रिया,
झालेल्या मुसळधार पावसाने हिवरखेड वासीयांचे प्रचंड नुकसान झाले संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित मदत घोषित करा,,
संदीप बोडखे,
( शिवसेना शिंदे गट अध्यक्ष हिवरखेड)
मी ग्रामपंचायत पदाधिकारी ,ग्रामविकास अधिकारी यांच्याशी बोलून गरजु नुकसान धारकांना त्वरित घरकूल योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्रयत्न करतो,
रवी उर्फ राणा घुंगळ
(ग्रा,प,सदस्य तथा प्रहार पक्ष सेवक हिवरखेड)
आमच्या भागात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांनच्या पिकांचे नुकसान झाले शासनाने त्वरित नुकसान धारक शेतकरी व ग्रामस्थांना विम्याचें कवच द्यावे,
धंनजय गावंडे,
(राष्ट्रवादी पक्ष प्रमुख,शरदपवार गट हिवरखेड)
Riport:जिल्हा. अकोला हिवरखेड…. शोएब खान