भडगांव शहरात प्लास्टिक वस्तू वापरावर कार्यवाही करा!,मराठा महासंघाचे नगरपालिका प्रशासनाला निवेदन!

Take action against the use of plastic items in Bhadgaon city!, Maratha Federation's statement to the municipal administration!

आबा सूर्यवंशी

(जळगाव प्रतिनिधि)-
भडगाव शहरात सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कोटेड चहाचे ग्लास, यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांचा भडगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जणू खेड सुरू केलाय की काय असा प्रश्न नागरिकांना उदबत होता. याचे दखल घेत अखिल भारतीय मराठा समाजाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी. बी. भोसले, यांनी भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना निवेदन देऊन येत्या येत्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणात कारवाई न झाल्यास व दबक्या स्वरूपाची कारवाई केल्यास अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे उपोषणाचा इशारा देण्यात येईल. व सध्या या प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक कोटेड असलेल्या चहाचे ग्लास, पिण्याचे पाण्याचे ग्लास, यांच्यामुळे कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर व प्लॅस्टीक पिशव्यांवर त्वरीत बंदी घालण्याबाबत.
चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाचे आतील मायक्रो प्लॅस्टीक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॅस्टीकचे कण पोटात जातात. ज्यामुळे हजारो नागरीकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाच्या कपावर बंदी घालण्यात यावी.
तसेच प्लॅस्टीक पिशव्या हया नागरीक व दुकानदार रस्त्यावर फेकुन देतात. त्यामुळे त्या रस्त्यावर पडलेल्या प्लॅस्टीक पिशव्या हया गुर ढोरे, सर्व जनावरे खातात. त्यामुळे सदरचे प्लॅस्टीक पिश्व्यांमुळे सदरचे जनावरांचेही जिवाला धोका पोहचतो. म्हणुन सदरहू प्लॅस्टीक पिशव्यांवर देखील त्वरीत बंदी घालण्यात यावी.
त्यामुळे वरील कारणांचा विचार होऊन हॉटेल दुकान, किराणा दुकानदार, व इतर सर्व व्यावसायीकांना सदरील चहाचे कागदी कप व प्लॅस्टीक पिशव्या वापरण्यास बंदी करण्याचे आदेशीत करुन त्यांनी पालन न केल्यास त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या संदर्भात आठ दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाची तारीख कळवुन भडगांव नगरपरिषदे समोर उपोषण करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. प्लास्टिक वस्तू वापरावर कार्यवाही करावी असे निवेदन नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी.बी.भोसले यांच्यासह भारत पाटील, सुनील भदाणे भारत शामराव पाटील, आधार पाटील, रोहिदास पाटील, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button