अमरावती:बोदड येथे संविधान दिन संपन्न
संवाददाता सैयद गनी अचलपुर जिला अमरावती महाराष्ट्र,
बोदड:संविधान सन्मान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बोदळ सुभानपूर येथे संविधान जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे उद्घाटन आयुष्यमती सुचिताताई मोहनराव चौधरी सरपंच बोदड- सुभानपूर यांनी केले. आपले मनोगत व्यक्त करताना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाल्या की,भारताची एकता व अखंडता कायम ठेवायची असेल तर केवळ संविधानच ठेवू शकते व संविधान चिरायू होणे ही काळाची गरज आहे. असेही म्हणाल्या त्यानंतर विवेक भाऊ देशकर माजी सैनिक यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, भारतातील मुक्या समाजाला बोलके करण्याचं काम भारतीय संविधानाने केले याचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते.या सभेचे विशेष उपस्थिती म्हणून मा.निळकंठराव मांडवकर मा.मधुकरराव सोलव मा. श्रीकृष्णराव तायडे मा.ज्ञानेश्वरराव मांडवकर मा.प्रभाकरराव देशकर मा. राजूभाऊ ठाकरे मा.प्रमोदभाऊ काळे मा. महादेवराव गहरे मा.मुरलीधरराव सोलव मा.मधुकरराव शनवारे तसेच प्रमुख अतिथी म्हणून रोशनभाऊ भडांगे, मौसराज दांडगे किशोर तायडे, रविभाऊ उईके बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.संविधान जागृती सभेचे अध्यक्षता करताना राष्ट्रीय किसान मोर्चाचे बाबा मोहोड म्हणाले की, विषमतेवर आधारित मनुचे संविधान नाकारून समता स्वतंत्र बंधुता व न्यायावर आधारित संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिले तसेच मानवी हक्क अधिकाराचे रक्षण करणारे संविधान नष्ट करून पुन्हा बहुजन समाजाला मनुवादी शक्ती गुलाम बनू पाहत आहे. या विरोधात बहुजन समाजाने एकवटलं पाहिजे. असे आव्हान याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत मुक्ती मोर्चाचे मा.कैलासभाऊ कडलिंग यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन मा.निलेश पारवे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. रोशनभाऊ भडांगे यांनी केले.