महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कराडचे प्रकाश जाधव मेहरबान यांची निवड झाली आहे

Prakash Jadhav Meharban of Karad has been elected as the regional vice-president of Maharashtra Parit Dhobi Seva Mandal.

 

कराड : विद्या मोरे
परीट समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन 9 मार्च 2025 रोजी शिर्डी येथे संपन्न झाले होते. यावेळी नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून खंडेराव कडलग यांची बिनविरोध निवड झाली होती. यावेळी राज्य कार्यकारिणी निवडीचे अधिकार प्रदेशाध्यक्ष कडलग यांना देण्यात आले होते. यावेळी प्रत्येक पदासाठी राज्यातून सुमारे पाच ते दहा अर्ज व शिफारशी आलेल्या होत्या. परीट समाजाची माजी प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शन व विचाराने या राज्याच्या निवडी करण्यात आल्या असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव मेहरबान हे गेली 14 वर्षे काम पाहत असून त्यांनी या काळात परीट समाजासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानामुळे त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून समाजाचे काम राज्य पातळीवर दखलपात्र झाले असून समाजाने दिलेल्या संधीचे सोने करत समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन प्रकाश जाधव यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्य कार्यकारिणीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना प्रकाश जाधव म्हणाले की महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे नूतन प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग, माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार , राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे सर, कार्याध्यक्ष सनथ वाढाई (गोंदिया), प्रदेश महासचिव सुनील फंड (अहिल्या नगर), सहसचिव रवींद्र कणेकर (कोकण), सहसचिव रवींद्र अंदुरेकर (अकोला), कोषाध्यक्ष सुधीर पाटोळे (पुणे) यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवत प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्या विश्वासात पात्र राहून यापुढेही समाजासाठी काम करणार आहे.
सातारा जिल्ह्यातील मला साथ देणारे आमचे मार्गदर्शक बबनराव शिंदे आप्पा,संत गाडगे महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष शामराव सोनटक्के,माजी अध्यक्ष भिकू राक्षे,दिलीप नलवडे, व जिल्हा पदाधिकारी व समाज बांधव
यांचे बहुमोल मार्गदर्शन निश्चित राहील व यांच्या पाठिंब्यावरच समाजासाठी भरीव काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते उदयसिंह पाटील, कराड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील व जिल्ह्यातील परीट समाजांनी या निवडीबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button