कराड नगरीला लाभलेला हा रसाळ तेजस्वी सूर्य म्हणजे श्री. रणजीत पाटील (नाना) की ज्या सूर्याच्या प्रकाशात कराड स्फटिका सारखे स्वच्छ झालं. महाराष्ट्राच्या नकाशावर अग्रभागी राहिलं

कराड महाराष्ट्र से श्रीमती विद्या मोरे की रिपोर्ट

कराड नगरीला लाभलेला हा रसाळ तेजस्वी सूर्य म्हणजे श्री. रणजीत पाटील (नाना) की ज्या सूर्याच्या प्रकाशात कराड स्फटिका सारखे स्वच्छ झालं. महाराष्ट्राच्या नकाशावर अग्रभागी राहिलं.लौकीकास प्राप्त झाले.नाना सारख्या कराड विकासाचे ध्येय असलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे खरंतर हे शक्य झाले. नानांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेल्यास ते झाले नाही असे होत नाही. नानांनी प्रत्येक क्षेत्रात प्रचंड माणसे जोडली आहेत.नाना हे आजात शत्रू आहेत. अलीकडे नानांनी मा.मुख्यमंत्री एकनाथ

शिंदेजी यांचे कडून कराड साठी जवळजवळ 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आणि कराडतील सर्व रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने डांबरीकरण केले. सर्वसामान्य माणूस या रस्त्यावरून जाताना नानांचे कौतुक करत आहे. अशा प्रकारचे काम नानांनी कराड आणि पंचक्रोशीत करावे अशी लोकांची इच्छा आहे. कराड साठी नानांनी केलेले काम अवर्णनीय आहे. त्यामध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त, अंगणवाडी सेविकांना साडी- चोळी, लहान मुलांसाठी वह्या पुस्तकांचे वाटप, रक्तदान शिबिर ,आरोग्य शिबिर ,वृक्ष लागवड व वृक्षांचे संवर्धन ,उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप,तसेच नुकतंच नानांचा वाढदिवस 18 जुलै रोजी झाला त्यानिमित्त “बाई पण भारी देवा” हा चित्रपट महिलांसाठी शनिवार आणि रविवार रोजी मोफत दाखवला. तसेच दिनांक 2 ऑक्टोबर रोजी “शासन आपल्या दारी”या योजनेमार्फत मिळणाऱ्या सगळ्या फायद्यांचा प्रचार आणि प्रसार करून लोकांना जागृत केले. नव्यानेच नानांनी छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार केला असून नजीकच्या काळात मुख्यमंत्र्याकडे सादर करणार आहेत. नानांनी सदाशिवगड येथे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही केलेले आहे.तसेच कराडात 3000 वृक्षांचे रोपण आणि संवर्धन केले आहे. असे माननीय रणजीत पाटील (नाना )हे बहुआयामी सामाजिक व्यक्तिमत्व असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन, ज्येष्ठ नागरिक संघ, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल यांनी त्यांचा यथोचित सत्कार सोमवार दिनांक .31 जुलै रोजी केलेला आहे. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जेष्ठ नागरिक संघ, संस्थापक सदस्य, प्रा. डॉ. चंद्रकांत माने यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button