Akola news:समाजकार्याची दखल घेत अकोट रोटरी क्लब 5 पुरस्कारने सन्मानीत
रिपोर्ट:महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
स्थानिक अकोट शरीरात गेल्या 52 वर्षापासून अकोट रोटरी क्लब एक सामाजिक संस्था असून अनेक समाज उपयोगी कार्य करत आहे.नुकत्याच गांधी सिटी वर्धा येथे संपन्न् झालेल्या ड्रिस्ट्रीक्ट् अर्वाड संमारंभात अकोट रोटरी क्लब ला वर्ष 2022-23 वर्षात केलेल्या सामाजीक कार्याची दखल घेत रोटरी क्लब ला डिस्ट्रिक्ट 3030 ने उत्कृष्ट् आय केअर अर्वाड, बेस्ट फेलोशिप, प्रेसिडंट साइटेशन अर्वाड,100% काँट्रीब्युटिंग क्ल्ब,डिस्ट्रीक्ट् कॉन्फरेन्स मध्ये सर्वात जास्त् उपस्थीती हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर रोटरीची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंदजी झुंझुंवाला, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजे संग्रामसिंगजी भोसले, शब्बीरजीस शाकीर महेश मोकळकर के एस राजन आशाजी वेणुगोपाल नाना शेवाळे, रमेश मेहेर उपस्थित होते.वर्षभर केलेल्या कार्याची पावती म्हणुन मिळवलेल्या पुरस्काराणे सर्व सदस्यांमध्ये मध्ये उत्साहाचे तसेच नवीन प्रेरणेचे वातावरण पसरलेले आहे हया समारंभा करिता रोटरीचे अध्यक्ष अनंता काळे, गायत्री काळे. सचिव नंदकिशोर शेगेाकार, मीना शेगोकार, शौर्य शेगोकार,संजयजी बोरोडे ,शारदा ताई बोरोडे उपस्थीत होते. वर्षभर मिळालेल्या सहकार्या प्रती सर्व सदस्यांचे तसेच माजी अध्यक्षयांचे अध्यक्ष व सचिव यांनी आभार व्यक्त केले अशी माहिती रोटरी चे जनसंपर्क अधिकारी कल्पेश गुलाहे कळवितात