महाड-रामदास पठार एस.टी
(श्री.नितीन सकपाळ पो.पा. पारमाची):- आदर्शगाव ग्रुप-ग्रामपंचायत पारमाची हद्दीतील पंचक्रोशीतील माझेरी,पारमाची वाडी,बौद्धवाडी, पारमाची,सुनेभाऊ आणि रामदास पठार या गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी,कामगार,आबालवृद्ध यांचे दळण-वळण च्या दृष्टीने प्रामुख्याने एस.टी.वाहतुक शिवाय पर्याय नाही.
त्याअनुषंगाने… ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे सातत्याने पाठपुराव्याने ही वाहतूक सुरू झाली आहे. परंतु काही कारणास्तव सकाळी ९.०० वा. ची मुंबई गाडी थेट महाड पर्यंत न जाता ती बिरवाडी वरून वळविण्यात येते.त्यामुळे मुंबईत जाणारे चाकरमानी आणि परिसरातील कॉलेज विद्यार्थी यांचे पुढील प्रवासात खूप हाल होत असल्याने सदर ही बाब आमचे निदर्शनास आली.यावर ताबडतोब उपाययोजना म्हणून काळजीवाहू विद्यमान सरपंच श्री. दत्तात्रय पवार साहेब आणि तरुण-तडफदार उपसरपंच श्री.परशुराम कंक साहेब यांनी श्री. अनिलभाऊ मालुसरे आणि श्री. सुभाषशेठ मालुसरे यांना संपर्क करून आज सकाळी ११.०० वाजता महाड आगारात बोलाऊन घेतले.त्यांचे समवेत श्री. बा. ल.सकपाळ (गुरुजी) श्री. चंद्रकांत पवार,श्री. नितीन सकपाळ आणि विद्यमान सदस्य श्री. रामचंद्र दादा रेनोसे हे उपस्थित होते.महाड आगाराचे आगार प्रमुख श्री. शिवाजी जाधव साहेब यांचे दालनात जवळ-जवळ दोन तास सखोल चर्चा घडवून आणली. त्यानंतर आगार प्रमुख श्री. जाधव यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच सर्व फेऱ्या उद्यापासून पूर्ववत करून सेवा दिली जाईल अशी खात्री दिली.
शिवाय… येणाऱ्या गणेशोत्सव सणानिमित्त महाड-पुणे सर्व फेऱ्या सन्मानीय आमदार श्री. भरतशेठ गोगावले साहेबांच्या आदेशाने उद्या वरंध घाट ते भोर एक ट्रायल फेरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत महाड पुणे वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरु होईल अशी माहिती दिली.
सदर चर्चा सकारात्मक झाली.
त्यामुळे येणारे चाकरमानी यांचा पुणे महाड हा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
.नितीन सकपाळ
(पोलीस पाटील पारमाची)