Akola news:वंचित बहुजन आघाडी अकोट शहरात जनसंपर्क कार्यालय उदघाटन व महिला मेळावा
रिपोर्ट:महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
23/8/2023 अकोट शहर… वंचित बहुजन आघाडी अकोट शहराच्या वतीने, जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 8, गाझी प्लॉट येथे, जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ८ चे नेतृत्व वहीद खान यांनी केले. पमुख पाहुणे प्रभाताइ सिरसाठ, ,शोभाताई शेळके ,निलोफर शहा, दीपक बोडखे,राजेंद्र भाऊ पतोळे, प्रदीप वानखडे, आम्रपाली ताई, चरण इंगळे, कार्यक्रमाचे आयोजक दिनेश घोडेस्वार, विशाल आग्रे,जम्मू पटेल, इम्रान खान पठाण विशाल तेलगोटे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल आग्रे यांनी केले. तर आभार दिनेश घोडेस्वार यांनी मानले. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मयूर सपकाळ, आशिष रायबोले, झिया शहा, सुनील वाकोडे, रामकृष्ण मिसाळ, सुनील गनबहादूर, अक्षय तेलगोटे,सिद्धेश्वर बेराळ, संजय पुंडकर, अतुल अडाऊ, मनोहर शेळके, सचिन सरकटे , अब्रार खान,कांतीराम गहले, मीरा तायडे, प्रदीप पाटील, अतिक पटेल, फाझील पटेल, स्वप्नील वाघ, नितीन वाघ,अर्चना वानखडे. पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाची महिला मंडळी तसेच पुरुष मंडळी यांची उपस्थिती भरपूर होती. आपल्या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाच्या कुठल्याही अडचणी असतील तर या वंचित बहुजन आघाडी दूर करण्यास कडीबद्ध असेल, यावेळी अंजलीताई मार्गदर्शनपर बोलत होत्या. यानंतर आपले मनोगत महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या महासचिव तथा अकोट च्या निरीक्षक सौ शोभाताई शेळके व निलोफर शहा यांनी सुद्धा मांडले, कार्यक्रमाच्या यशस्वी देखील त्यांनी सुद्धा अथक परिश्रम घेतले.