Akola news:आज दिनांक 25/08/2023 रोजी संध्याकाळी 6/15 वादरम्यान दोन् इसम ज्यांचे नाव 1. खालीद इनामदार 2. फाजील शेख
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद की ये रिपोर्ट
यांनी नर्सिंग रोड बिकानेर स्वीट मार्ट जवळ एक पाच वर्षाचा मुलगा फिरताना दिसला त्यात त्याचे आई-वडिलांचा पत्ता विचारला असता तो काही सांगत नव्हता म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनअकोट शहरला आणले वरून कर्तव्यावर हजर असलेले डी बी पथक इन्चार्ज पोलीस उप निरीक्षक अख्तर शेख पोहे का हिम्मत दंदी ब.न1540 पोलीस स्टेशन अकोट शहर यांनी माननीय पोलीस निरीक्षक तपन कोल्हे साहेब यांना माहिती दिली की एक लहान मुलगा त्याचे घर विसरले असून तो रस्त्याने भटकत होता म्हणून त्या मुलास वरील दोन्ही लोकांनी आणून जमा केले अशी माहिती माननीय कोल्हे साहेब यांनी दिलेल्या सूचना वरून पोलीस उप निरीक्षक अख्तर शेख आणि हेड कॉन्स्टेबल हिम्मत दंदी यांनी व्हाट्सअप ग्रुप वरून व पोलीस स्टेशनच्या ग्रुप वर त्या मुलाचा फोटो शेअर करून व मज्जिद मध्ये सुद्धा लाऊड स्पीकर वर माहिती देऊन ते फोटो शेअर केले अवघ्या अर्ध्या तासांमध्ये त्या मुलाच्या आई वडील पोलीस उप निरीक्षक अख्तर शेख आणि पोलीस अंमलदार हिम्मत दंदी यांनी शोधून काढले आणि सुखरूप त्या मुलाला त्याचे आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले विशेष म्हणजे त्या लहान मुलाचे आई-वडील मूकबधिर आहेत सदर कार्यवाही मा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे साहेब यांचे मार्गदर्शनात डी बी पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक अख्तर शेख पोलीस अंमलदार हिम्मत दंदी पोलीस स्टेशनं अकोट शहर यांनी केली आहे