Akola news:कावड महोत्सवात आरोग्य सेवाकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

रिपोर्ट:महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोला दिनांक 10 सप्टेंबर 2023 दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोल्यात कावड व पालखी महोत्सव साजरा होत आहे या महोत्सवा च्या मार्गावर अकोला ते गांधीग्राम दरम्यान शिवभक्तांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दहा आरोग्य पथके सज्ज झाली असून या पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे तीन शिप्ट मध्ये ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे संकल्पनेने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांचे मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेली आहे.सदर 10 आरोग्य पथकचे नियोजन बाबत मा मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी , अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत पवार साथरोग अधिकारी डॉ जावेद खान यांनी सदर नियोजनाचे पूर्व तयारीचा नियमित आढवा घेवून प्रत्यक्ष आरोग्य पथकास भेटी देऊन आरोग्य कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.ॲड बाळासाहेब आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे सह जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अढाऊ,उपाध्यक्ष सुनील फाटकर,समजकल्यान सभपती आम्रपालीताई खंडारे,सभापती कृषी व पशुसवर्धन योगिताताई रोकडे,सभापती शिक्षण मायाताई संजय नाईक,सभापती महिला व बालकल्याण रिजवना परवीन यांचेसह,जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई इंगळे, प्रमोदिनीताई गोपाल कोल्हे ,जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,महासचिव मिलिंद इंगळे, प्रभाताई शिरसाट जिल्हाध्यक्ष, ॲड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प प्रमुख निलेश देव, नितीन सपकाळ ,विकास सदांशिव प्रसिदी प्रमुख वंचीत बहुजन आघाडी यांनी शिवभक्त कावडधारी यांना सेवा देत असलेल्या आरोग्य पथकांना भेटी देऊन देत असलेल्या आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे.शिवभक्तांना आरोग्य सेवा मिळणे बाबत मा मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांचे मार्गदरशनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगदीश बनसोडे डॉ राठी, डॉ रुपेश कळसकर, विस्तार अधिकारी आरोग्य अविनाश बेलोकर आरोग्य, आरोग्य सहायक जयवंत मालोकर,आठवले,सेवक राम मेटांगे,गावंडे, आरोग्य सेविका बिल्लेवर यांचेसह सर्व आरोग्य पथक प्रमुख समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक , आरोग्य सेविका तसेच रूग्ण वाहिकेचे वाहन चालक परिश्रम घेत आहेत.



