Akola news:मुंडगाव येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

रिपोर्ट:महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
शेतकऱ्यांना शेती करण्यास मदत करणाऱ्या बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात.असाच प्रकार मुंडगाव येथे मोठ्या उत्साहात पोळा पाहव्यास मिळाला सर्वप्रथम अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवयुक्त ठाणेदार संजय खंडाळे साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार मुंडगाव ग्रामपंचायतचे सरपंच मीनाताई उईके यांच्या हस्ते करण्यात आला व व यामध्ये आज मुंडगाव ग्रामपंचायत च्या वतीने सार्वजनिक पोळा उत्साहात प्रथम क्रमांक पटकवणारे बैल मालक मेहमूद बेग यांच्या जोडीला झूल देऊन व बैल मालकाला शाल व श्रीफळ देऊन अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवयुक्त ठाणेदार संजय खंडाळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व यामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य व कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थित होते



