Akola news:अकोट..अकोला नाका ब्रिजवर पथदिवे न लावल्यास आमरण उपोषण,वंचित बहुजन आघाडी अकोट शहराचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनेद
अकोला:अकोला नाका येथील ब्रिजवर अद्यापही प्रशासनाने पथदिवे लावले नसल्याने, तेथे अपघाताचे प्रमाण जास्त वाढले आहे. वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष दिपक रामदासजी बोडखे यांच्या मार्गदर्शनामध्ये वंचित बहुजन आघाडी अकोट शहराच्या वतीने 6 ऑक्टोबर 2023 रोजी पथदिवे लावण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही. सायंकाळी सहा वाजल्यानंतर ब्रिजवर अंधाराचे साम्राज्य पसरते, पथदिवे लावण्या संदर्भात कोणीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही, कोट्यावधी रुपयाचा निधी असताना सुद्धा गावाच्या सुरुवातीला असलेला व अकोट शहराचे नाक असलेला मुख्य रस्त्यावरील रेल्वे ब्रिज हा अंधारातच का राहतोय याचाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना अद्भुत्भावत आहे. ह्या ब्रिजवर छोटे-मोठे अपघात सुद्धा या ठिकाणी होत आहेत. ब्रिजवर मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण बीज वरून सर्व ग्रामीण भागातील रहिवासी,विद्यार्थी, मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक तसेच नागपूर,अमरावती, दर्यापूर, अकोला, शेगाव कडे ये जा करणारे प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने बेजबाबदारीपणाचे धोरण त्वरित थांबवून ब्रिजवर पद्धतीने लावून विद्युत रोषनाई येथे चार ते पाच दिवसाच्या आत करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी अकोट शहराच्या वतीने सोमवार दिनांक 6 /11/ 2023 पासून अकोला नाका ब्रिज समोर आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे विशाल आग्रे, दिनेश घोडेस्वार, जम्मू पटेल, इम्रान पठाण,अक्षय तेलगोटे, नितीन वाघ,सक्सेस लबडे, दादू निताळे,अजीम इनामदार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.