फौजी लग्नाच्या बोहल्यावरुन उतरताच देशाच्या रक्षणासाठी सीमेवर रवाना!,नाही फिटली हळद, नाही मिटली मेहंदी, देशापुढे काहीच नाही !!

As soon as the soldiers got off the wedding bandwagon, they left for the border to protect the country!, The turmeric has not set, the mehndi has not faded, there is nothing before the country!!

(आबा सूर्यवंशी महाराष्ट्र प्रतिनिधी)-

जळगाव- पाचोरा
मागील २२ एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम घटित अतिरेक्यांच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देश विदेशात संताप उसळला असून देशाचा प्रत्येक नागरिक पाकिस्तान वर सरकारने हल्ला करून बदला घेण्याची वाट पहात होता. जनतेच्या संतप्त भावना लक्षात घेता काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान सीमेवरील अतिरेक्यांना प्रशिक्षण देणाऱ्या दहशतवाद्यांचे नऊ अड्डे नष्ट करून कुख्यात अतिरेकी अझर मसूदचे खानदान मातीत मिळवून बदला घेतला आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सैन्यातील जे जवान सुट्टीसाठी गेले होते त्या सर्व जवानांना कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश निघाले आहे.

वराचा अंगाला हळद, नवरीच्या हाताला मेहंदी, अन् जवान निघाला सीमेवर

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील फौजी मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चि.सौ.का. यामिनी हिच्याशी नुकताच ५ मे रोजी विवाह संपन्न झाला होता. परंतु विवाह झाल्यावर अवघ्या तिसऱ्या दिवशी त्यांना सेवेत रुजू होण्याचे फर्मान आले. मनोज याने आदेश वाचताच क्षणाचाही विलंब न लावता अंगावर गणवेश चढवत देश रक्षणार्थ सीमेवर जाण्याची तयारी केली. नववधू अर्धांगिनीला त्याने परत येण्याचा विश्वास दिला अन् आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे.जवान मनोज पाटील याची हळद फिटली नसतांना विवाहाचा कोणताही आनंद साजरा झाला नाही. देशापुढे काहीच नाही ही भावना फक्त भारतीय जवानांमध्ये असते.
पाचोरा शहरातील स्व. राजीव गांधी कॉलनीत मनोज पाटील यांचा रहीवास आहे. तेथुनच ते रवाना झाले. पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यांस देशाच्या सरहद्दीवर रवाना करतांना त्याचे आईव वडील नव विवाहिता पत्नी, भाऊ , मित्र परिवाराने मोठ्या उत्साहाने त्यास सीमेवर जाण्यासाठी मनोबल दिल्याचे पाहून सर्वांचे अंतःकरण पिवळटून निघाल्याचे पहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button