जवानांना फर्मान आणि जवान सीमेवर जाण्यासाठी सज्ज!,फौजी विजय तांबे कर्तव्यावर निघाले

Orders to the soldiers and soldiers are ready to go to the border!, Army Chief Vijay Tambe leaves for duty

(आबा सूर्यवंशी / महाराष्ट्र प्रतिनिधी)

पाचोरा शहरातील सुपुत्र व देशसेवेत कार्यरत असलेले जवान विजय तांबे हे काही दिवसांपूर्वी सुट्टीवर पाचोरा येथे आले होते. त्यांनी सुट्टीचा कालावधी कुटुंबीयांसह घालवित असतानाच वरिष्ठ लष्करी कार्यालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार त्यांना तात्काळ सेवेस हजर होण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.या पार्श्वभूमीवर विजय तांबे हे उद्या दिनांक १० मे शनिवार रोजी सकाळी ६ वाजता अमृतसर एक्सप्रेसने पुन्हा देशसेवे साठी रवाना होणार आहेत. त्यांनी आतापर्यंत १३९ मिडियम रेजिमेंटमध्ये नायक या पदावर सलग १८ वर्षे कर्तव्य बजावले असून, सध्या ते ग्वालियर येथे होणाऱ्या प्लॅटून मोहिमेत सहभागी होणार आहेत.
या निमित्ताने ज्यांना विजय तांबे यांना निरोप द्यायचा आहे, त्यांनी १० मे रोजी सकाळी ५.३० वा. पाचोरा रेल्वे स्थानकावर उपस्थित राहावे
ते पत्रकार मिलिंद सोनवणे यांचे पाहुणे आहेत.
देशासाठी सतत सज्ज असलेल्या या वीर जवानाला निरोप देताना अभिमान आणि देशप्रेमाची भावना जागृत होणार हे नक्की. विजय तांबे यांच्या सेवेला सलाम!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button