वकिलाकडे कारकुनी करणारा झाला न्यायाधीश
A lawyer's clerk became a judge
भोर येथील अमित साठे चा
प्रेरणादाई प्रवास
(आबा सूर्यवंशी/ महाराष्ट्र प्रतिनिधी)-
(पुणे) जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर माणूस असाध्य वाटनारेही साध्य करू शकतो अशी अनेक उदाहरणे आहेत आपल्याला पदोपदी पाहायला मिळतात वकिलाच्या कार्यालयात कारकुनी करणाऱ्याने कठोर परिश्रम आणि अभ्यासाच्या बळावर न्यायाधीशापर्यंत झेप घेतली आहे. अमित साठे असे या तरुणाचे नाव आहे. भोर येथील या वर्षीय २८ युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायाधीश आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे त्याने राज्यातील निवड झालेल्या १४४ न्यायाधीशांच्या यादीत ३६ वा क्रमांक मिळविला आहे त्यामुळे आता अमित दिवानी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायदान करणार आहे.
अमितचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे अमित भोर मधील एका सामान्य कुटुंबात जन्मला. घरची परिस्थिती बेताची होती त्याचे शालेय शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात झाली तर उच्च शिक्षण अनंतराव थोपटे महाविद्यालयात झाले वडील टपाल खात्यात कार्यरत आहेत अमितला शिक्षणाची आवड निर्माण झाली. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्याला एल एल बी करायची इच्छा होती पण घरचे आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला एक वर्षाचा ब्रेक घ्यावा लागला.
या काळात आम्ही बँकेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अर्जाचे काम केले त्यानंतर त्याला भोरमधील ज्येष्ठविधी तज्ञ एडवोकेट विजय मुकादम यांच्या कार्यालयात कारकुनाची नोकरी मिळाली या ठिकाणी काम करताना एडवोकेट मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने एल एल बी ला प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली.२०२१ मध्ये पुण्यातील यशंतराव चव्हाण विधि महाविद्यालयातून त्याने एल एल बी ची पदवी मिळवली त्यानंतर लगेचच दिवाणी न्यायाधीश या न्यायदंडाधिकारी परीक्षेची तयार सुरू केली काही कारणामुळे परीक्षा लांबीवर पडली तरी आम्ही अभ्यास अखंड सुरूच ठेवला तो नियमितपणे अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाऊन अभ्यास करत असे. दोन वर्षाच्या परीश्रमाचे फळ त्याने सलग दोन वर्ष अथक परीश्रम घेतले. ॲड. विजय मुकादम व ॲड. अजिंक्य मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली अमितने या परीक्षेची जोरदार तयारी केली.
यासोबतच पुण्यातील एका खाजगी अकादमीत आठवड्यातून एकदा होणाऱ्या व्याख्यानाचाही त्याला लाभ झाला या सर्व प्रयत्नामुळेच अमितने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.
३) अमितचा हा संघर्षमय प्रवास निश्चितच अनेक तरुणांना नवीन दिशा आणि प्रेरणा देणारा आहे.