स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. येथील शंभू तीर्थावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंभुतीर्थावर सजावट करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजीतनाना पाटील, प्रमोद तोडकर , विष्णू पाटसकर, सागर आमले, अनिल खुंटाळे , श्रीकृष्ण पाटील, प्रताप इंगवले, सुनील शिंदे, सचिन वास्के, सचिन राऊत, ओमकार पलंगे, काकासाहेब जाधव, साहेबराव शेवाळे, एडवोकेट दीपक थोरात, विद्या मोरे, सो नैना पाटील, शिवाजी पवार, महादेव पवार , संतोष शितोळे, देवानंद देशमुख, रोहित पंडित
कराड : विद्या मोरे
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. येथील शंभू तीर्थावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंभुतीर्थावर सजावट करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजीतनाना पाटील, प्रमोद तोडकर , विष्णू पाटसकर, सागर आमले, अनिल खुंटाळे , श्रीकृष्ण पाटील, प्रताप इंगवले, सुनील शिंदे, सचिन वास्के, सचिन राऊत, ओमकार पलंगे, काकासाहेब जाधव, साहेबराव शेवाळे, एडवोकेट दीपक थोरात, विद्या मोरे, सो नैना पाटील, शिवाजी पवार, महादेव पवार , संतोष शितोळे, देवानंद देशमुख, रोहित पंडित, किरण शिंदे व शंभूप्रेमी नागरिक उपस्थित होते.
जयंतीनिमित्त स्मारक समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन कृष्णा रुग्णालयाच्या रक्तपेढीत करण्यात आले होते तेथे अनेक तात्यांनी रक्तदान केले. यात एका जवानाचा समावेश होता. जम्मू काश्मीर येथे सैन्यात सेवा बजावत असलेले मुक्तार बब्बर सय्यद यांनी रक्तदान करून कर्तव्यावर रवाना झाले. त्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला तर आर्यन मुळीक या विद्यार्थ्याने दहावी परीक्षेत 96 टक्के गुण मिळवल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.