राजेंद्रसिंह यादव यांची शिवसेना जिल्हा समन्वयकपदी निवड पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

Rajendrasinh Yadav elected as Shiv Sena District Coordinator Appointment letter presented by Guardian Minister Shambhuraj Desai

कराड : विद्या मोरे
शिवसेनेच्या सातारा जिल्हा समन्वयक पदी शिवसेना नेते व कराडच्या यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची निवड करण्यात आली आहे.
कराड येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात राज्याचे पर्यटन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते राजेंद्रसिंह यादव यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. संपर्क प्रमुख शरद कणसे यावेळी उपस्थित होते.
या निवडीच्या निमित्ताने राजेंद्रसिंह यादव यांना शिवसेनेत जिल्हा स्तरावर काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यादव यांना संघटन कौशल्यासाठी सर्वत्र ओळखले जाते. त्यामुळे शिवसेना बळकट करण्यासाठी यादव यांचा उपयोग होईल, असा विश्वास शिवसेना पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर कराड शहराच्या विकासासाठी सुमारे सव्वा तीनशे कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मिळवला होता. यात कराडच्या भुयारी गटार योजना, पाणी योजनेचे अद्ययावतीकरण, कराडच्या शिवतीर्थचे सुशोभीकरण, अन्य स्मारक सुशोभीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.
विश्वास सार्थ ठरवणार- राजेंद्रसिंह यादव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपणावर शिवसेना जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवणार असून शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
राजेंद्रसिंह यादव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button