विजय दिवस समारोह समितीच्या वतीने “कारगिल विजय कलशाचे” पूजन व मानवंदना
कराड: विद्या मोरे
दिल्ली येथील सिटीझन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने, कारगिल युद्धातील,२६ व्या विजय कलश मोहिमेचे, विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कराड रेल्वे स्टेशन वर भव्य स्वागत करुन, कलशाचे पूजन केले व कराड करांच्या वतीने विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव सुभेदार विलासराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी २६ व्या विजय कलश मोहिमेचे नेतृत्व करणारे मेजर जनरल पूरोहित, ब्रिगेडियर रवी मुनिस्वामी, कर्नल पी. व्ही. हरी व त्यांच्या टीमचे स्मृती चिन्ह, योद्धा सह्याद्रीचा कर्नल संभाजी पाटील गौरव ग्रंथ, व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
कारगिल विजय कलश यात्रा नवी दिल्ली येथून सुरू झाली असून देशभर प्रवास करुन २६ जुलै रोजी कारगिल द्रास सेक्टर येथे होणाऱ्या भव्य विजयोत्सव समारंभात संपणार आहे.
कराड रेल्वे स्टेशन वर कलश यात्रेचे आगमनावेळी मोठ्या संख्येने मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या स्वागत, कलश पूजन व सत्कार प्रसंगी
विजय दिवस समारोह समितीचे पदाधिकारी, वृक्ष मित्र चंद्रकांत जाधव, उद्योगपती सलिम भाई मुजावर, स्टेशन मास्तर अनिल शिंदे, राजीव अपिने सर, प्रा. जालिंदर काशीद, प्राचार्य गणपतराव कणसे, आत्माराम अर्जुगडे, प्रसाद पावसकर, अभियंता ए. आर पवार, विजय खबाले, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप व एनव्हायर क्लबचे सर्व सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराड रेल्वे स्टेशन चे प्रमुख अनिल शिंदे यांनी रेल्वे ची पाच मिनिटे वेळ वाढवून घेतल्यामुळे, रेल्वे स्टेशन वर कारगिल विजय कलशाचे भव्य स्वागत, कलशाचे पूजन करून हुतात्म्यांना पुष्पांजली वाहण्याचा समारंभ संपन्न झाला.