पाचोरा पीपल्स बँक निवडणूक:गजानन महाराज मंदिरात श्रीफळ वाढवून निलेश मराठेंचा प्रचार सुरू,ॲड अतुल संघवी यांचे कडून मराठे परिवाराची बदनामी!
Pachora People's Bank Election: Nilesh Marathe's campaign begins by raising the Shreephal in the Gajanan Maharaj temple, Adv Atul Sanghvi defames the Marathe family!
पाचोरा प्रतिनिधी – (आबा सूर्यवंशी)
पाचोरा पीपल्स बँकेचे उमेदवार निलेश मराठे यांनी आज शहराच्या पुनगाव रोडवरील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात परिवाराचे जेष्ठ आणि समर्थकांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली.
पाचोरा पीपल्स बँकेची न निवडणूक मतदान प्रक्रिया दिनांक १३ जून रोजी पार पडणार आहे.
*मातब्बर संघवी प्रणित सहकार पॅनलला आव्हान*
पाचोरा पीपल्स बँक निवडणूक एकतर्फी बिनविरोध चा प्रयत्न
निलेश मराठे यांनी जनरल गटातील उमेदवारी कायम ठेवल्याने या बँकेची निवडणूक लागली आहे.
अपक्ष उमेदवार निलेश मराठे आणि अतुल संघवी यांच्यात आरोपांचा कलगीतुरा
बँकेचे चेअरमन ॲड अतुल संघवी यांनी सहकार पॅनल पॅनलच्या ९ जागा बिनविरोध करून वर्चस्व सिद्ध केले ,परंतु बँकेच्या आणि चेअरमन अतुल संघवी यांच्या मनमानी कारभारावर नाराज असलेले बँकेचे माजी संचालक , माजी उपनगराध्यक्ष , पेट्रोलपंप उद्योजक विनायक मराठे यांचे चिरंजीव डेंटल डॉक्टर निलेश मराठे यांनी जनरल गटातून उमेदवारी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने बिनविरोध च्या वाटेवर असलेल्या पीपल्स बँकेला इतर गटातून नऊ विरुद्ध एक अशी निवडणूक करण्याची वेळ आली आहे.
माझ्यामुळे मतदारांना मतदानाचा अधिकार
बँकेचे उमेदवार निलेश मराठे यांनी पत्रकार परिषदेतून चेअरमन ॲड अतुल संघवी आणि त्यांचे संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करीत असून जातीयवादी लॉबी चालवीत आहे. बँकेत गोरगरीब कर्जदारांनी कामे , कर्ज प्रकरणे मंजूर केली जात नाही, बँकेत कर्मचारी भरतीत भूमिपुत्रांना स्थान न देता त्यांच्या जवळच्या व बाहेरगावच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहेत. ५१ रू . शेअर्स धारकांची हजारो नावे कमी करून त्यांना सभासदत्व आणि त्यांचा मतदानाच्या हक्क काढून घेण्यात आला आहे. कर्ज वसुलीसाठी कायद्याचा आधार केसेस करणे,अधिकारी , कर्मचारी पाठवून सक्तीची वसुली , जप्ती करणे, कर्जदारांची मानहानी करणे अशी अनेक उदाहरणे आणि तक्रारी आहेत. माझी उमेदवारी माझ्या वयक्तिक आर्थिक फायद्यासाठी आहे असे सांगतात. माझ्या एका न्यायप्रविष्ठ कर्ज प्रकरणी बँकेकडे गेल्या १कोटी ८० लाख रुपये न्यूली अकाउंट मध्ये जमा असून त्या रकमेचा बँक प्रशासन गैर वापर करीत असल्याचा संशय असून मला त्या रकमेचे व्याज दिले जात नाही. मी करीत असलेली उमेदवारी आणि माझ्या उमेदवारी मुळे बँकेच्या मतदारांना त्यांच्या मतांचा हक्क मिळवून देण्यासाठी पारदर्शक कारभार ,लघु उद्योजक , शेतकरी, व्यापारी, सभासद ,ठेवीदार यांचे आणि बँकेचे हित जोपासण्यासाठी आहे.
चेअरमन ॲड. अतुल संघवी यांचे कडून आमची सामाजिक बदनामी
चेअरमन ॲड अतुल संघवी हे आमच्या मराठे परिवारावर बिनबुडाचे, खोटे आरोप करून आमच्या परिवाराची जाहीर बदनामी करून बँकेच्या मतदारांची दिशाभूल करीत आहे. तर दुसरीकडे ॲड. अतुल संघवी देखील त्यांची बाजू मांडत एकमेकांविरोधात कलगीतुरा सद्या रंगला आहे.
निलेश मराठे यांचा प्रचार शुभारंभ
आज दि.३ जुलै गुरुवार रोजी उमेदवार निलेश मराठे यांनी गजानन महाराज मंदिर येथे नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. श्रींच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी विजयासाठी प्रार्थना केली. प्रसंगी त्यांच्यासोबत अनेक मान्यवर सह त्यांचे काका सुरेश गोविंदराव मराठे, वडील विनायक गोविंदराव मराठे, राजेंद्र गोविंदराव मराठे, सुशील सुरेश मराठे, तुषार सुरेश मराठे, हर्षल राजेंद्र मराठे, अजय वसंतराव थेटे, मनोज सिसोदिया, भिकन मराठे, कैलास मराठे, कायदेशी सल्लागार ॲड.शांतीलाल सैंदाणे बापू यांचा समावेश होता.