विनोबा भावे नगर पोलीस स्टेशनमार्फत गणेश मंडळांची बैठक यशस्वीरित्या संपन्न,शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा दिला संदेश

The meeting of Ganesh Mandals was successfully held through Vinoba Bhave Nagar Police Station, giving a message of peace, security and social responsibility.

रिपोर्ट: अजय उपाध्याय

मुंबई, कुर्ला: येथील विनोबा भावे नगर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर उपस्थित होते. या बैठकीत उत्सव काळात शिस्त, सुरक्षा आणि सामाजिक भान राखण्यावर विशेष भर देण्यात आला.

वरिष्ठ निरीक्षक क्षीरसागर यांनी आपला अनुभव सांगत उपस्थित मंडळांना खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या:

1. बीएमसी आणि पोलीस परवानगी शिवाय मंडप उभारणे टाळावे.

2. विजेच्या संदर्भात चोरीची वायरिंग व अपायकारक जोडण्या पूर्णतः वर्ज्य.

3. उच्च दर्जाचे इलेक्ट्रिक साहित्य आणि प्रमाणित ट्रिपरचा वापर करणे अनिवार्य.

4. टेंपरेरी इलेक्ट्रिक मीटर अधिकृतरित्या भाड्याने घेणे बंधनकारक.

5. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे कोणतेही काम न करण्याचे निर्देश.

6. मंडळांनी नशा विरोधी, महिला सक्षमीकरण, कायदा जागरूकता यासारख्या सामाजिक विषयांवर आधारित झांक्यांचे आयोजन करावे.

7. सर्वोत्तम सामाजिक झांकी सादर करणाऱ्या पहिल्या पाच मंडळांना ट्रॉफी प्रदान केली जाईल.

8. मंडपामध्ये जुगार/सट्टा यासारख्या कोणत्याही अवैध क्रियाकलापांवर बंदी आहे.

9. कोणत्याही अडचणीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा नियुक्त अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.

 

बैठकीच्या शेवटी पोलीस विभागाने सर्व मंडळांकडून पूर्ण सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत, येणारा गणेशोत्सव शांततेत, अनुशासित आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button