सद् भावना दिवस सामुहिक प्रतिज्ञा घेत नमुंमपा मुख्यालयात स्व.राजीव गांधी यांस अभिवादन
नवी मुंबई महानगरपालिका
दि. 20 / 08 / 2025
सद् भावना दिवसानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे सद् भावना प्रतिज्ञा घेत माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, लेखाधिकारी श्री.विजय रांजणे व श्री.दयानंद कोळी, अतिक्रमण विभागाचे सहा.आयुक्त श्री.अरूण पाटील, विधी अधिकारी श्री.अभय जाधव, इस्टेट मॅनेजर श्री.अशोक अहिरे यांच्या समवेत उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी सद् भावना दिवस प्रतिज्ञा ग्रहण केली.
“मी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेच भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन” – अशा प्रकारची सद् भावना दिवस प्रतिज्ञा याप्रसंगी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली.