Mumbai news:मुख्यमंत्री शिंदेचा सहकाऱ्यांसोबत जय श्री राम चा नारा
रिपोर्ट:नितिन शिंदे
मुंबई:अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात आपल्या सहकाऱ्यांसह “जय श्रीराम” चा जयघोष केला. स्वतः ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी शेकडो रामभक्तांसह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त अभिजीत बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.