Satara news:उद्योगिनी फाउंडेशनच्या रन फॉर नेशन मिनी मेराथॉन स्पर्धेत,उत्साहाने धावल्या शेकडो महिला

सातारा, दि. 17 : महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम राष्ट्र उभारणीमध्ये महिलांचे योगदान आणि राष्ट्रा प्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी उद्योगिनी फाउंडेशन व विविध महिला संस्थांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त रन, वॉक फॉर नेशन या संकल्पनेवर आधारित महिलांची मिनी मेराथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

 

सकाळी 6 वाजल्यापासूनच या मेराथॉनसाठी संपूर्ण कराड शहरातून अत्यंत आनंद व उत्साहात महिलांची पावले दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे धाव घेत होती आणि बघता बघता शेकडो महिला या रन / वॉक फॉर नेशनसाठी जमा झाल्या. सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आझाद चौक-चावडी चौक ते प्रितीसंगम घाट अशा मार्गाने होत असलेल्या मेराथॉन स्पर्धेत पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करुन विविध वयोगटातील, विविध स्तरातील महिला उत्साहाने, आनंदाने एक वेगळ्या उर्जेने धावत होत्या.ही मिनी मेराथॉन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून सुरु होऊन प्रितीसंगमावरील घाटाजवळ समाप्त झाली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला आदरांजली अर्पण करुन संपूर्ण देशवासियांचे जीवन कन्या, भगिनी, माता या स्त्री शक्तीच्या विविध रुपातून सुखी व संपन्न करण्यासाठी कटीबद्ध होण्याची या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी कृष्णा सरिता महिला बाझार, महिला उद्योग पतसंस्थेच्या चेअरमन उत्ताराताई भोसले, पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण, प्रतिज्ञा घेण्यात आली. दत्त चौकातून सुरु झालेल्या या मिनी मेराथॉनला जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आणि उद्योगिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनल भोसेकर यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली.
स्वतःची व कुटुंबाची उन्नती करण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन सक्षमीकरण घडवणे ही काळाची गरज आहे असे उत्तराताई भोसले यांनी सांगितले.

 

 

महिलांच्या कार्यक्षमतेचा उपयोग हा अर्थार्जनासाठी व व्हावा व त्यांनी एकत्र येणं हे खूप मोठे आव्हान आहे आणि स्त्री शक्ती ही नक्कीच घडवू शकते असे चित्रलेखा माने कदम यांनी सांगितले
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना श्रीमती भोसेकर म्हणाल्या. महिला दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादीत न राहता तो वर्षभर साजरा झाला. महिला एक संघ झाल्या पाहिजेत. त्या एकजूट होऊन नारी शक्ती देशाच्या विकासासाठी गतीमान करणे ही देशाची गरज आहे. उद्योगिनी फाउंडेशन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा महिला लाभ मिळवून देणे, महिला उद्योग प्रर्वन करणे, उद्योगासाठी अर्थसहाय्य मिळवून देणे, कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे यासाठी अनेक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून कार्यरत आहे. ही संस्था हंगर फ्री इंडिया मोमेंट आणि टाईप-1 डायबेटीक मुलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवित असते. या संस्थेशी महाराष्ट्रातील एकूण 16 जिलह्यांमधील तसेच महाराष्ट्राबाहेरी दुबई मधून सुद्धा विविध स्तरातील जवळपास 26 हजार महिला जोडल्या गेलेल्या आहेत. या संस्थेने शासनाच्या विविध योजनांमधून 17 कोटीहून अधिक कर्ज महिला उद्योजिकांना व्यावसायासाठी मिळवून दिले आहे.
यावेळी 18 ते 76 वयोगटात महिला स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी महिलांसाठी मेडिकल असोसिएशन व लायन्स क्लब यांच्याकडून आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमा काळे सायली मिरजकर रितू मधुरा निकिता प्रेमळ शहा तसरीम हेमंत अंबाली यांनी मेहनत घेतली कविता पवार शार्दुल चरेगावकर संजय बधी आणि शहा सचदेव यांनी मोलाची मदत केली कराड शहरातील जवळपास 36 महिला संस्था यांनी एकत्र येऊन सुमारे 900 महिला या कार्यक्रमास सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य त्यामध्ये कराड मधील गृहिणी प्राध्यापिका डॉक्टर्स इंजिनियर्स विद्यार्थिनी वकील या सर्वांचा सहभाग होता..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी जाधव यांनी केले तर आभार पुष्पा कुलकर्णी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button