Akola news:अकोट ग्रामीण पोलिसांची अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही

Akola:पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेशचंद्र सोळंके, ब. नं. 0 3, पो कॉ सुनील वराडे, ब. नं. 21 77, पो. कॉ. गोपाल जाधव ब. नं. 841 असे शासकीय वाहनाने आसेगावं बाजार परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना दुपारी 11:45 वाजताच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की मालधुरे नावाचा इसम त्याचे मोटरसायकलवर कवठा ते आसेगाव बाजार रोडणे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा घेऊन जाणार आहे. अशी माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक पंचबुधे यांनी सदरची माहिती पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, ग्रामीण यांना देऊन त्यांचे आदेशाने दोन पंचांना घेऊन नाकाबंदी करून नाकाबंदी करून मोटार सायकलवर अवैध गुटख्याची वाहतूक करणारा इसम नामे अनिल रघुनाथ मालधुरे वय 66 वर्ष , रा. नंदिपेठ अकोट ह्याला त्याची मोटर सायकल हिरो एचएफ डीलक्स क्रमांक एम एच 30 ए एल 24 76 सह ताब्यात घेऊन ताब्यात घेऊन त्याचे मोटरसायकलवर असलेल्या थैल्यांची झडती घेतली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला 20, 190 रुपयाचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा मिळून आला. त्यावृंव 20,190/- रू चा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व चाळीस हजार रुपयाची मोटरसायकल असा एकूण 60,190,/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.ही कार्यवाही मा. संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला, मा. मोनिका राऊत अपर पोलीस अधीक्षक अकोला, मा रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, व पोलीस निरीक्षक अकोट ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे, पो हे कॉ उमेशचंद्र सोळंके, पो कॉ सुनील वैराळे, पो कॉ गोपाल जाधव यांनी केली.
जिल्हा अकोला से मोहम्मद जुनेद की ये रिपोर्ट



