Akola news:गुणवंत विद्यार्थी देशाचे उज्वल भविष्य! बळवंत अरखराव

मराठा सेवा संघ द्वारा गुणवंताचा गौरव
आकोट

महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

शालांत परिक्षेत तथा महाविद्यालयीन परिक्षेत नेत्रदिपक यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांनी आकोटचा लौकीक वाढविला आहे.हे प्रज्ञावंत म्हणजे उद्याचे उज्वल भविष्य आहे.त्यांचेकडून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेवून यशाची उंच झेप घ्यावी असा हितोपदेश आकोटचे उपविभागीय अधिकारी शिवश्री बळवंत अरखराव यांनी केला.
मराठा सेवा संघाचे आकोट शाखेचे विद्यमाने राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती तथा गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बळवंत अरखराव बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गजाननराव चोपडे होते.या प्रसंगी शिक्षण महर्षि डाॕ.पं.दे.शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रभाकरराव झोड, कृउबास सभापती शिवश्री प्रशांत पाचडे,उपसभापती शिवश्री अतुल खोटरे ,शिवश्री विनायकराव मोडसे,शिवश्री मुकुंदराव गावंडे,युवानेते कपिल ढोके,प्रा.अनंत मरकाळे,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिवमती रेणू गावंडे प्राचार्य संजय वालसिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संगितसुर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या तालुकाध्यक्ष डाॕ.प्रा.प्रतिभा वाघ यांनी जिजाऊ वंदना गायीली.यावेळी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त या थोर समाजसुधारक लोकराजाला भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.डाॕ.प्रा.अनंत मरकाळे,कपिल ढोके यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
आकोट तालुक्यातून राज्य लोकसेवा आयोगामार्फत शिवश्री गोपाल चौधरी यांची उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली.त्यांचा तथा लोकमतचे प्रतिनिधी विजय शिंदे यांनी यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत
कला शाखेतील मुल्य आणि आध्यात्मिक शिक्षण पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तसेच माधुरी नाठे, क्षितिजा अस्वार,अंजली इंगळे,जिग्नेश चावडा,प्रितम पाटील,शितल हागे,रितू मासोदकर, ओम तळोकार यांनी विद्यापीठांतर्गत विविध क्रिडा स्पर्धेत पदकाचे मानकरी ठरल्याबद्दल त्यांना विशेष गौरवान्वित करण्यात आले.
वैद्यकीय एम बी बी स परिक्षेत डाॕ.श्रेया वालसिंगे,डाॕ.श्रवण हिंगणकर ,डाॕ चैतन्य थारकर,डाॕ.शुभम तळोकार, डाॕ.प्रतिक दोड,शल्य चिकित्सक वैद्यकीय पदव्युत्तर परिक्षेत डाॕ स्नेहल वालसिंगे तथा आयुर्वेद वैद्यकीय स्नातक परिक्षेत डाॕ प्रेरणा बिहाडे,डाॕ गायत्री इंगळे,डाॕ गायत्री खोले यांनी नेत्रदिपक यश संपादन केला बद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच वैद्यकीय प्रवेश पात्रता (नीट) परिक्षेत प्रवेश पात्र ठरणारे वैदेही प्रकाश भुयार,ओम सुरेश कुकडे,अभिजित श्रीकृष्ण सोनोने,शिवा धुमाळे यांचा गौरव करण्यात आला.यावेळी १०वी व १२ वी परिक्षेतील ९०%पेक्षा जास्त गुण प्राप्त १६० विद्यार्थ्यांना गौरव पत्र व गौरव चिन्ह देवून सन्मानित करण्यात,कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री प्रा. वाल्मिक भगत यांनी केले, शिवश्री डी आर साबळे,शिवश्री राजेश कुलट,जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिवमती अर्चना सावरकर,संभाजी ब्रिगेड चे शिवश्री गोपाल सावरकर, पं.दे.शिक्षण परिषदेचे तालुकाध्यक्ष अनिल चौधरी यांनी अतिथींचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे संचालन शिवश्री डिंगाबर खडसे व प्रकाश बिहाडे यांनी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष राममुर्ती वालसिंगे यांनी केले.

याप्रसंगी शिवसेना नेते दिलिप बोचे,नगरसेवक विवेक बोचे,अॕड अतुल सोनखासकर,नंदकिशोर हिंगणकर ,अनंत गावंडे,जिजाबाई देशमुख,डाॕ.अनघाताई सोनखासकर, अतुल म्हैसणे, मायाताई म्हैसणे, वृंदाताई मंगळे,अविनाश डिक्कर, संदिप बोबडे,उमेश बोचे,भास्करराव देशमुख,सुधीर खोले,वामनराव लोखंडे,,प्रदिप रावणकार, विठ्ठलराव नारे,रामदास मंगळे,बंडु कुलट, अनिल गोंडचवर,विष्णू झामरे,संदिप कोरडे, गजानन पाथरे, मुकुंद मोरे,हेमंत बहाकार,पद्माकर वाघ,गोपाल महाले,मनोज लोडम,सागर तळोकार, विष्णू झामरे,दिलिप कराळे तथा
गुणवंत विद्यार्थी,त्यांचे पालक,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समाज बांधव, शिक्षकवृंद तथा शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button