Akola news:कोणाचे अनुकरण करण्यापेक्षा विचारांचे अनुसरण करणे म्हणजे यशाला गवसणी घालणे,न्या. बाविस्कर साहेब
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर सर यांचा आस्की च्या मुलांना "सक्सेस मंत्रा"
महाराष्ट्र अकोट
प्रतिनिधी मोहम्मद जुनैद
कर्मवीर आधुनिक शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष मिलिंद झाडे यांच्या प्रेरणेतुन आणि सचिव नितीनजी झाडे यांच्या संकल्पनेतून तसेच प्राचार्य नेहा झाडे मॅडम व पर्यवेक्षक पवन चितोडे यांच्या मार्गदर्शनात “द सक्सेस मंत्रा” चे सहावे पुष्प आज आस्की किड्स पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाले.दर महिन्याला होणाऱ्या सक्सेस मंत्रा चे या महिन्याचे नियोजन वैशाली कुलकर्णी आणि मनिष सरकटे सर यांनी केले होते. नोव्हेंबर महिन्याचे सक्सेस मंत्रा प्रेरणास्रोत न्यायमूर्ती मा. चकोर बाविस्कर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश, अकोट हे होते.विद्यार्थ्यांशी यशाचे गमक उलगडताना बाविस्कर सर यांनी आपल्या जिवनकाळातील अनेक घटनांचा उलघडा केला.
“लौकिक सुखासाठी केलेली धडपड ही मुलांच्या विकासास मर्यादित करते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने मानसिक समाधानासाठी आनंदप्राप्ती साठी प्रयत्न करावेत म्हणजे तो जीवनात यशस्वी होईल. यशाचा पाठलाग करतांना कोण्या एका व्यक्तीचे अनुकरण करण्यापेक्षा, कोण्या एका व्यक्तीच्या विचाराचे अनुसरून करावे. म्हणजे स्वत्वाची जाणीव होईल. आणि स्वतःच्या कौशल्याची माहिती होईल. ज्यातून विद्यार्थी आपसुक यशाकडे खेचले जातील.”असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी सक्सेस मंत्रा च्या या कार्यक्रमाला वर्ग ७ ते १० चे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी श्री चकोर बाविस्कर सर यांना न्यायालयीन, अध्यात्मिक, मौलिक, भविष्यकालीन आव्हाने इत्यादी बाबीवर प्रश्न विचारले. ज्याला बाविस्कर सर यांनी दिलखुलास उत्तरे दिली.यावेळी विचारपिठावर सौ. बाविस्कर, मिलिंद झाडे सर यांच्यासोबत नितीनजी झाडे आणि प्राचार्य नेहा झाडे मॅम यांची उपस्थिती होती. यावेळी नितीनजी झाडे सर यांनी बाविस्कर सर यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रावणी यावले आणि गौरी भुस्कट यांनी केले तर प्रास्ताविक इतिहास शिक्षक मनिष सरकटे यांनी आणि आभार प्रदर्शन अनमोल गणगणेने मानले.सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नवनाथ उबाळे, अरुणा काळे, मंजुषा हरणे आणि मयुरी खवले यांनी प्रयत्न केले. यावेळी आस्कीचे संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.