राज्याच्या क्रिडा- नगर विकासविभाग यांच्यावतीने आयोजीत क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धांमध्ये पाचोरा नगरपरिषदेचा उत्स्फुर्त सहभाग,पाचोरा पालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांनी पटकावली बक्षिसे!
Pachora Municipal Council's enthusiastic participation in the sports and cultural competitions organized by the State Sports-Urban Development Department, Pachora Municipality officers and employees won the script prize!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा –
राज्याच्या क्रिडा धोरणाअंतर्गत नगरविकास विभाग यांच्या वतीने नगरपरिषदांमध्ये काम करत असतांना कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी व्हावा जागरुकता निर्माण व्हावी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले असावे या उद्देशाने खेळांमुळे सांघीक भावना वाढीस लागून कर्मचाऱ्यां मधील सुप्त कला-गुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव -२०२५ चे आयोजन दि.२७ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत जळगांव येथे नगरविकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्फत करण्यात आले होते.जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध नगरपरिषदांनी सहभाग नोंदविला. पाचोरा नगरपरिषदेने देखील मोठया प्रमाणात विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आघाडी घेतली होती. व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये पाचोरा संघ विजेता क्रिकेट स्पर्धेंत उपविजेता, वैयक्तीक स्पर्धांमध्ये तीन किलोमिटर चालणे यांत योगेश रेवेकर, विद्युत अभियंता हे प्रथम क्रमांक मिळवून विजेता ठरले. समुह गायनामध्ये दिपक शेजवळ, दिपक खैरे हे उपविजेता ठरले. गोळा फेक या प्रकारात चंद्रकांत माळी हे उपविजेता झाले. सांस्कृतीक कार्यक्रमा अंतर्गत मुख्याधिकारी मंगेश देवरे, संगणक अभियंता मंगेश माने, लिपीक ललित सोनार यांनी वैयक्तीक गित सादर केले. सदरचे यश हे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनातून प्राप्त झाले असून त्यांनी सर्व विजय स्पर्धकांचे अभिनंदन केले . यापुढे देखील अधिकाघीक यश प्राप्त करावे म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत.
राज्याच्या या क्रिडा धोरणाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे . संपन्न झालेल्या या क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह असून पुढील वर्षी देखील अशा स्पर्धांचे आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात यावे अशी मागणी अधिकारी – कर्मचाऱ्यां कडून होत आहे.