स्त्रीचं मनोबल, कष्ट, आणि तिच्या स्वप्नांची उंची कुठल्याही क्षेत्रात तिला यशस्वी करू शकते. ती घर संसार चालवू शकते, समाजात आपला ठसा उमटवू शकते, आणि अगदी परंपरागत पुरुषप्रधान क्षेत्रांमध्ये देखील यश संपादन करू शकते.
स्त्रीचं मनोबल, कष्ट, आणि तिच्या स्वप्नांची उंची कुठल्याही क्षेत्रात तिला यशस्वी करू शकते. ती घर संसार चालवू शकते, समाजात आपला ठसा उमटवू शकते, आणि अगदी परंपरागत पुरुषप्रधान क्षेत्रांमध्ये देखील यश संपादन करू शकते. स्त्रियांचं सामर्थ्य अनंत असतं, आणि त्यांच्या निर्णयक्षमतेला आणि जिद्दीला काहीही अडवू शकत नाही.क्षेत्र कोणतंही असो सौन्दर्यापासून संघर्षापर्यंत स्त्रियांच्या महतीचा वैभव इतिहास आहे… सांगण्याचे निमित्त म्हणजे गणेशोत्सव उत्साहात सुरु आहे… गौरी गणपती आरास,देखावे मन वेधून घेतात,असाच एक आगळा वेगळा देखावा सुपने गावच्या सरपंच विश्रांती व्यंकटराव पाटील यांनी सजवला आहे…संपूर्ण महाराष्ट्राला आणि हौशी शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेचा बैलगाडा शर्यतीचा देखावा… या देखाव्यातून त्यांच्या समर्थ्यशाली नेतृत्वाची झलक जाणवते…असा हा रांगडा बैलगाडा शर्यत देखावा पाहण्यासाठी उत्तरा सुरेश भोसले, सुपने गावच्या ग्रामसेवक वर्षा पवार, डॉ. सिद्धली जाधव तसेच सुपने गावाच्या परिसरातील ग्रामस्थ, महिलांनी देखावा पाहून कौतुक केले.
महाराष्ट्र कराडहून पियुष गोरे यांची रिपोर्ट