Akola news:फ्रीडम शाळेच्या विद्यार्थ्यांची अकोट पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेट
प्रतिनिधी मोहम्मद जुनैद
आकोट स्थानिक गजानन नगर येथील फ्रीडम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अकोट शहर पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत भेट दिली.सर्व प्रथम पोलीस स्टेशन च्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी आकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे साहेब व उपस्थित पोलीस कर्मचा-यांना त्यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल सलामी देऊन त्यांचे भारत स्काऊट गाईड च्या वतीने स्वागत करण्यात आले. ठाणेदार साहेबांनी पोलीस स्टेशन मध्ये कशाप्रकारे कार्य चालते तसेच पोलिसांची कार्यपद्धती व समाजात वावरताना कशाप्रकारे नियम पाळावेत याबद्दल माहिती व आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन केले. यावेळी मिलींद दंदी साहेब यांनी देखील सायबर क्राईम ,मोबाईलच्या योग्य वापराबद्दल व पोलीस स्टेशन मध्ये उपलब्ध शस्त्रांबद्दल व त्याच्या उपयोगाबद्दल अत्यंत महत्वाची माहिती दिली.सदर क्षेत्रभेटीचे आयोजन शाळा समिती अध्यक्ष प्रवीण झाडे, फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे तसेच फ्रीडम इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. अरुणा ताले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते क्षेत्रभेटी यशस्वी तेकरिता पर्यवेक्षक विजय रेवस्कार, प्रभारी शिक्षिका राखी वांगे, पूजा बेराड, मयुरी अकोटकर, प्रीती सोनवणे, विक्रांत सर सहकार्य केल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.